Happy Birthday Sara Ali Khan: सारा अली खान हिचे 25 व्या वाढदिवसाचे कुटुंबियांसह सेलिब्रेशन; पहा फोटोज
Sara Ali Khan Birthday Celebration (Photo Credits: Instagram)

Happy Birthday Sara Ali Khan: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिचा आज वाढदिवस. बॉलिवूड ब्यूटी सारा आज 25 वर्षांची झाली. वाढदिवसानिमित्त देशभरातून सारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. साराने देखील आपला बर्थडे कुटुंबियासह घरातच अगदी दणक्यात साजरा केला. या खास क्षणांचे काही फोटोज साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात साराचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. साराच्या इंस्टास्टोरीत ती टी-शर्ट आणि पयजामा मध्ये फुगे घेऊन बसलेली दिसत आहे. तसंच आकर्षक बर्थडे डेकोरेशनही पाहायला मिळत आहे.

फोटोमध्ये दोन केक दिसत आहेत. एक भाऊ इब्राहीम अली खान (Ibrahim Ali Khan) आणि दुसरा आई अमृता सिंह (Amrita Singh)हिच्याकडून देण्यात आला आहे. साराचा नटखट आणि चुलबुला अंदाज फोटोत पाहायला मिळत आहे. (सारा अली खान ने शेअर केला तिच्या आयुष्यातील खऱ्या 'मिकी माऊस'चा फोटो; Watch Photo)

पहा पोस्ट:

Sara Ali Khan Birthday Celebration (Photo Credits: Instagram)
Sara Ali Khan Birthday Celebration (Photo Credits: Instagram)

सारा सध्या आपल्या कुटुंबियांसह गोव्यात असल्याची माहिती समोर येत आहे. अलिकडेच साराने आपला भाऊ इब्राहीम याच्यासोबत सायकलिंग करतानाचा फोटो शेअर केला होता. दरम्यान सारा लवकरच वरुण धवन सोबत 'कुली नंबर 1' आणि अक्षय कुमार, धनुष याच्या सोबत 'अतरंगी रे' सिनेमात झळकणार आहे.