सारा अली खान हिची भाऊ इब्राहीम अली खान सह विकेंडची हेल्थी सुरुवात; सायकलिंग करतानाचे फोटोज सोशल मीडियावर केले शेअर (View Pics)

कोरोना व्हायरसचे संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे विशेष खबरदारी घेऊनच लोक घराबाहेर पडत आहेत. बॉलिवूड सेलिब्रेटी देखील कोविड-19 च्या या संकटात नियमांचे पालन करताना दिसत आहेत.

सारा अली खान हिची भाऊ इब्राहीम अली खान सह विकेंडची हेल्थी सुरुवात; सायकलिंग करतानाचे फोटोज सोशल मीडियावर केले शेअर (View Pics)
Sara Ali khan, Ibrahim Ali Khan (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे विशेष खबरदारी घेऊनच लोक घराबाहेर पडत आहेत. बॉलिवूड सेलिब्रेटी देखील कोविड-19 च्या या संकटात नियमांचे पालन करताना दिसत आहेत. विशेषतः मुंबईत कोरोना व्हायरसचे संकट दाट आहे. त्यामुळे अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नका असे आवाहन केले जात आहे. दरम्यान, फिटनेस फ्रिक सेलिब्रेटींना व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सारा अली खान (Sara Ali Khan) आणि तिचा भाऊ इब्राहीम अली खान (Ibrahim Ali Khan) यांनी विकेंडला सुरुवात होताच घराबाहेर पाऊल ठेवले आहे. सायकलिंगसाठी घराबाहेर पडत दोघांनी विकेंडची हेल्थी सुरुवात केली आहे. सायकलिंग करताना या भावंडांनी मास्क लावण्याचा नियम अगदी शिस्तीने पाळला आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या सारा अली खान हिने इंस्टाग्रामवर भाऊ इब्राहीमसोबत सायकलिंग करतानाचे फोटोज शेअर केले आहेत. ज्यात दोघांची स्टाईल पाहण्याजोगी आहे. दोघेही मास्क घालून सायकलवर बसून पोज देत आहेत. अनेकदा सारा आणि इब्राहीम दोघेही जीममध्ये एकत्र वर्कआऊट करतात. याचे फोटोजही त्यांनी अनेकदा शेअर केले आहेत. ('All Lives Matter' म्हणत सारा अली खान हिची पोस्ट; ट्रोलिंग कमेंट्सनंतर साराकडून पोस्ट डिलिट)

पहा फोटोज:

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर असणारा लॉकडाऊनमध्ये आता बहुतांश प्रमाणात शिथिलता आणली आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडत आहेत. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असताना सिनेमा-मालिकांचे शूटिंगही सुरु करण्यात आले आहे. मात्र अद्याप सिनेमागृह सुरु करण्यात आलेली नाहीत.

(The above story first appeared on LatestLY on Jul 11, 2020 09:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).