Happy Birthday Akshay Kumar: अक्षय कुमार याच्या वाढदिवसाच्या निमित्त चाहत्यांना मिळाले सरप्राइज, 'पृथ्वीराज' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित (Video)
Prithiviraj Teaser starring Akshay Kumar. (Photo Credits: YRF)

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा आज 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षय कुमार याला वाढदिवासाच्या शुभेच्छा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांकडून दिल्या जात आहेत. याच दिवसाचे औचित्य साधत अक्षय याने ही त्याच्या चाहत्यांना एक सरप्राइज दिले आहे. तर अक्षय याचा आगामी चित्रपट 'पृथीराज' (Prithviraj)  याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. याबाबत अक्षयने ट्वीट करत आगामी चित्रपटासाठी फार उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

अक्षयने असे म्हटले आहे की, सम्राट पृथ्वीराज चौहान हा चित्रपट आता पर्यंत केलेल्या बिग बजेट सिनेमामधील एक असणार आहे. चित्रपटाचे प्रोडक्शन यश राज फिल्म यांनी केले असून दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करत आहेत. तर पुढील वर्षात दिवाळी पर्यंत पृथ्वीराज हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझर मधून पृथ्वीराज या मुख्य भुमिकेतील लुक गुप्त ठेवण्यात आला आहे. तसेच अक्षय याचा चेहरा सुद्धा टीझरमधून दाखवण्यात आलेला नाही.(गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 'Daughter Of The Nation' या किताबाने सन्मानित करणार सरकार)

अक्षय कुमार ट्वीट:

चित्रपटाच्या टीझरमध्ये दमदार ब्रॅग्राउंट म्युझिक, चित्रपटाचा लोगो आणि लढाईच्या मैदानात उभ्या असलेल्या पृथ्वीराज चौहान याच्यासोबत हजारो शिपायांची झलक दिसून येत आहे. तसेच टीझर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर बॉलिवूड कलाकारांनी याचे कौतुक केले आहे. तर तापसी पन्नू हिने सुद्धा टीझरसाठी पसंदी दर्शवली आहे.