गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 'Daughter Of The Nation' या किताबाने सन्मानित करणार सरकार
Lata Mangeshkar (Photo Credits: IANS)

जगभरात ज्यांच्या आवाजाची जादू पसरली आहे अशा भारताच्या गानकोकिळी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना 'डॉटर ऑफ द नेशन' (Daughter Of The Nation) हा किताब देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारने 28 सप्टेंबरला प्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना हा किताब बहाल करण्यात येणार आहे. लता दीदीं यावर्षी वयाची नव्वदी पार करणार आहे. त्यामुळे गेले अनेक वर्षे त्यांना भारताला दिलेल्या सुरेल, सदाबहार गाण्यांच्या बदल्यात त्यांचे आभार मानण्यासाठी सरकारने ही घोषणा केली आहे.

लता दीदींनी गेली 7 दशके भारतीय चित्रपट संगीताला आपले अमूल्य योगदान दिले आहे. त्यांची गाण्यांनी भारतीय संगीताला विशेष असा दर्जा प्राप्त करुन दिला. शिवाय त्यांची गाणही आजही प्रत्येकाच्या ओठी ऐकायला मिळतात. त्यांच्या या योगदानाला सलाम करण्यासाठी आणि त्यांच मनापासून आभार मानण्यासाठी भारत सरकार त्यांना Daughter Of The Nation हा किताब बहाल करणार आहे.  हेही वाचा- रानु मंडल यांना सल्ला दिल्यामुळे लता मंगेशकर झाल्या ट्रोल

या अद्भूत सोहळ्यासाठी कवि-गीतकार प्रसून जोशी यांनी खास गाणे लिहिले आहे. सूत्रांनुसार, अशी माहिती दिली जात आहे की, "मोदी लता मंगेशकर यांच्या आवाजाचे चाहते आहेत. त्या भारताच्या सामूहिक आवाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांचे सन्मान करणे म्हणजे राष्ट्राच्या मुलीचा सन्मान करण्यासारखे आहे. आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या नव्वदीनिमित्त त्यांना या पुरस्काराने सन्मानितक करत आहोत."

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना हा किताब मिळणे ही भारतासाठी आणि भारतवासियांसाठी अभिमानाची गोष्ट असून सर्वच स्तरावरून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.