रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा चित्रपट 'गली बॉय' (Gully Boy) हा सर्व प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा ठरला आहे. तसेच या चित्रपटाची कथा अत्यंत उत्तम पद्धतीने लिहिली आणि मांडली आहे. मात्र प्रेक्षकांना आता ह्या चित्रपटाचा सिक्वल येणार का असा प्रश्न पडला होता. त्यामुळे गली बॉय चित्रपटाच्या सिक्वलबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसा, या चित्रपटाच्या सिक्वलसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. डेक्कन क्रोनिकल यांनी दिलेल्या वृत्तानुसार, जोया अख्तर (Zoya Akhtar) हिने खुद्द याबाबत कबुली दिली आहे. जोयाने असे म्हटले आहे की, माझी सहलेखिका आणि मला असे वाटते पूर्ण देशात हिप-हॉप कल्चर बद्दल आणखी नव्या गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. या चित्रपटाशी मिळते जुळते एक थिमसुद्धा तयार करण्यात येत आहे. तसेच या चित्रपटाच्या स्क्रिप्टिंगवर अद्याप काम सुरु आहे.
या चित्रपटात फरहान अख्तर याचा सुद्धा सहभाग नसणार आहे. गली बॉय चित्रपटातून झळकलेला एमसी शेरची भुमिका साकारणारा सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) ह्याला खुप प्रसिद्धी मिळाली आहे. तर आता गली बॉयच्या सिक्वल मध्ये जोया अख्तर आणखी नवीन काय दाखवणार याबाबत उत्सुकता लागून राहीली आहे.