 
                                                                 उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) चित्रनगरीच्या (Film City) उभारणीचे कंत्राट ज्येष्ठ निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांना मिळाले आहे. यासंबंधी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये कपूर यांची बोली सर्वाधिक ठरली आहे. नोएडातील गौतमबुद्ध नगरच्या जेवर येथे ही फिल्म सिटी उभारण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. हा उत्तर प्रदेश सरकारच्या मोठ्या प्रोजेक्टपैकी एक असणार आहे. उत्तर प्रदेशात भव्य चित्रनगरी उभारण्याची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाळगली आहे. यासोबतच पहिल्या टप्प्यामध्ये 230 एकरांवर फिल्मसिटी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ( हेही वाचा - Munawar Faruqui: बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकीच्या अडचणीत वाढ, रॅलीत ड्रोनचा वापर केल्याप्रकरणी डोंगरी पोलिसांकडून गुन्हा दाखल)
या चित्रनगरीच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये मेसर्स बेव्ह्यू प्रोजेक्ट एलएलपीची (बोनी कपूर व भूतानी समूह यांची कंपनी) बोली सर्वाधिक ठरली. या निविदा प्रक्रियेत सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज लि. (टी सीरिज), अभिनेता अक्षय कुमार, मॅडॉक फिल्म्स यांची सुपरसोनिक टेक्नोबिल प्रा. लि., निर्माता-दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांची फोर लायन्स फिल्म्स प्रा. लि. या कंपन्यादेखील सहभागी झाल्या होत्या.
सुमारे 1000 एकर जागेवर ही फिल्म सिटी उभारली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांत जेवर एअरपोर्टजवळ असणाऱ्या यमुना एक्स्प्रेस वेजवळच ही फिल्म सिटी उभारण्यात येणार आहे. या एअरपोर्टमुळे फिल्म सिटीला खूप फायदा होणार आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
