Munawar Faruqui: बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकीच्या अडचणीत वाढ, रॅलीत ड्रोनचा वापर केल्याप्रकरणी डोंगरी पोलिसांकडून गुन्हा दाखल

कॉमेडियन मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui) 'बिग बॉस 17'ची (Bigg Boss 17) ट्रॉफी जिंकल्यानंतर मुंबईत डोंगरीला गेला होता. याठिकाणी मुनव्वर फारूकीच्या चाहत्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत गेले. याठिकाणी मुनव्वर फारुकीची विजय रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला होता. डोंगरी पोलिसांनी (Dongri Police) याप्रकरणी ड्रोन ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. (हेही वाचा -  Munawar Faruqui Bigg Boss 17 Winner: मुनावर फारुखी ठरला बिग बॉसच्या 17 चा विजेता, वाचा कोणाला दिले त्यांनी यशाचे श्रेय)

बिग बॉस 17 विजेता मुनव्वर मुंबईच्या डोंगरी परिसरामध्ये राहतो. मुनव्वर डोंगरीमध्ये येताच त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी करत त्याचे स्वागत केले होते. मुनव्वरसोबत फोटो काढण्यासाठी चाहते त्याठिकाणी आले होते. यावेळी मुनव्वरच्या विजय रॅलीचे शूटिंग करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला होता. ड्रोनचा वापर करणाऱ्या ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ड्रोन ऑपरेटरने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल डोंगरी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान मुनव्वरचे स्वागत करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी या परिसरामध्ये मोठ-मोठे होर्डिंग्स आणि बॅनर देखील लावले होते. मुनव्वरच्या चाहत्यांनी या ठिकाणी ऐवढी गर्दी केली होती