Durgamati Release Date: भूमि पेडणेकर हिची प्रमुख भूमिका असलेल्या 'दुर्गामती' चित्रपटाची रिलीज डेट आली समोर, अभिनेत्रीने सोशल मिडियावरुन दिली माहिती
Durgamati Release Date (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडणेकर (Bhumi Pednekar) हिचा बहुचर्चित चित्रपट 'दुर्गामती' (Durgamati) लवकरच प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाविषयी चर्चा होती. मात्र आता याची रिलीज डेट समोर आली आहे. स्वत: भूमि पेडणेकर ने सोशल मिडिया अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. हा चित्रपट येत्या 11 डिसेंबरला OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भूमिचा एक वेगळाच अंदाज तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक अशोक यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट तमिळ चित्रपट भागमती याचा रिमेक आहे.

भूमि पेडणेकर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन हा चित्रपट येत्या 11 डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.हेदेखील वाचा- Shona Shona Songs Poster: सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल चा 'शोना शोना' गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज; पहा फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट असून अॅमेजॉन प्राईमवर हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटात भूमी आयएएस च्या भूमिकेत दिसणार आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित न करता ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. खिलाडी अक्षय कुमार नेही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. भूमिने या पोस्ट सह अक्षय कुमार आणि अर्शद वारसी ला देखील टॅग केले आहे. त्यामुळे हे दोघे देखील या चित्रपटात झळकणार असे संकेत मिळत आहे.