Shona Shona Songs Poster: बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि स्पर्धक शहनाज गिल (Shahnaz Gill) यांचा नवा म्यूझिक व्हिडिओ 'शोना शोना' चा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. हे पोस्टर खूपचं रोमँटिक आहे. यामध्ये सिद्धार्थ शुक्ला शहनाज गिलच्या डोळ्यात डोकावताना दिसत आहेत. सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांनी त्यांच्या अलीकडील म्युझिक व्हिडिओचे पोस्टर पुन्हा एकदा जाहीर केले आहे. हे पोस्टर त्यांच्या चाहत्यांना खूपचं आवडलं आहे. दोघांनीही या गाण्याचे पहिले पोस्टर शेअर केले आहेत.
या गाण्याचे शीर्षक 'शोना शोना' असं आहे. या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहेत. त्यात शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला असणार आहेत. हे गाणे टोनी कक्कड़ आणि नेहा कक्कड़ यांनी गायले आहे. शहनाज गिलने गाण्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हे पोस्टर शेअर करताना शहानाजने 'शोना शोना 25 नोव्हेंबरला रिलीज होईल,' असं म्हटलं आहे. या पोस्टमध्ये दोघेही रेट्रो स्टाईलमध्ये खूपचं सुंदर दिसत आहेत. तसेच दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवलेले दिसत आहेत. (हेही वाचा -Sapna Choudhary Video: सपना चौधरी आई बनल्यानंतर तिचा नवा अवतार आला समोर, हरयाणवी डान्सरचा नवा व्हिडिओ आला समोर)
View this post on Instagram
शहनाज सिद्धार्थच्या मिठीत दिसत आहे. बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुक्लाने शहनाज गिल, टोनी कक्कड़ आणि अंशुल गर्गसोबत एक फोटो शेअर केला आहे. नुकतीच 'शोना शोना' हा ट्रेंड सोशल मीडियावर पहिल्या क्रमांकावर होता. शहानाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला 'भुला दूंगा' या गाण्यानंतर दुसऱ्यांदा एकत्र येत आहेत. शहनाज गिल चं हे टोनी कक्कर यांच्याबरोबरचं दुसरे गाणं असणार आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थ शुक्लाला बिग बॉस 14 मध्ये सीनियर म्हणून पाहिले गेले होतं. त्यांच्यासोबत हिना खान आणि गौहर खान देखील होते. त्याचवेळी शहनाज गिलनेही बिग बॉस 14 च्या घरात प्रवेश केला होता. यावेळीसुद्धा सिद्धार्थ शुक्ला घरात खूप अॅक्टिव होते आणि हिना खानची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना आवडली होती.