Arjun Rampal with pregnant girlfriend Gabriella Demetriades (Photo Credits: Yogen Shah)

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याची पार्टनर Gabriella Demetraides हिचा भाऊ Agisilaos याला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणी त्याला 18 ऑक्टोंबरला ताब्यात घेण्यात आले आहे. एनसीबीच्या सुत्रांनी Qunit यांना असे म्हटले की, एगीसलोस डेमेट्रिडेस याला लोणावळा येथून अटक करण्यात आली आहे. तर गॅब्रिएला आणि अर्जुन रामपाल यांची चौकशी केली जात आहे.(बॉलिवूड अभिनेता Vivek Oberoi च्या मुंबई तील घरी पोलिसांचा छापा; Sandalwood Drug Case मधील संशयित आरोपी विवेकच्या नात्यात!)

एगीसलोस डेमेट्रिएड्स (Agisilaos Demetraides) याच्याकडे चरस आणि Alprazolam च्या टॅबलेट मिळाल्या आहेत. याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची NCB कोठडी सुनावण्यात आली आहे. बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेली आतापर्यंती ही 23 वी वेळ आहे. यापूर्वी 21 क्रमांकाचा आरोपी क्षितिज प्रसाद याचे निकटवर्तीय जय मधोक याला अटक करण्यात आली होती.

सुत्रांनी असे सांगितले की, 30 वर्षीय एगीसलोस याचे अन्य काही ड्रग्ज पेडलर्स सोबत संबंध होते. जे या प्रकरणातील आरोपी आहेत. एगीसलोस हा बराच काळात भारतात घालवत मार्केटिंग मध्ये ही होता. हा त्याचा उद्योग बनावट असून त्याचा वापर तो ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी करत होता. एगीसलोस  याच्या विरोधात NDPS कायद्याच्या कलम 27A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Drugs Case: 'राष्ट्रीय वाहिनी'च्या एका रिपोर्टरला मुंबईकर पत्रकारांनी फटकावले)

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणाला ड्रग्जचे वळण लागल्यानंतर एनसीबीकडून रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. तर जवळजळ एका महिन्यानंतर 7 ऑक्टोंबरला तिला बॉम्बे हायकोर्टाकडून जामिन मिळाला. रिया हिला एनसीबीने 9 सप्टेंबरला अटक केली होती. हायकोर्टाने या प्रकरणी 29 सप्टेंबर रोजी आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. तर कोर्टाने असे रिया हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याचा जामिन मात्र फेटाळून लावला होता.