बॉलिवूड अभिनेता Vivek Oberoi च्या मुंबई तील घरी पोलिसांचा छापा; Sandalwood Drug Case मधील संशयित आरोपी विवेकच्या नात्यात!
विवेक ओबेरॉय (Photo Credits: Instagram)

Sandalwood Drug Case:   बॉलिवूड अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या (Vivek Oberoi) मुंबईमधील घरावर बंगळूरू पोलिसांकडू आज (15 ऑक्टोबर) छापा टाकण्यात आला असे वृत्त आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, दुपारी 1 च्या सुमारास ही छापेमारी झाली असून यामध्ये 2 बंगळूरू पोलिस त्याच्या घरू पोहचले होते. दरम्यान पोलिस विवेकचा मेव्हणा आदित्य अल्वा (Aditya Alva) याची ड्रग्जच्या प्रकरणामध्ये चौकशी आणि तपास करत आहेत.

NDTV च्या वृत्तानुसार, Joint Commissioner Crime, संदीप पाटील यांनी याबद्दल माहिती आहे. आदित्य अल्वा हा फरार आहे. विवेक ओबेरॉय त्याचा नातलग आहे. आणि पोलिसांना आदित्य विवेककडे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कोर्टाकडून वॉरंट घेऊन क्राईम ब्रान्च टीम त्याच्या मुंबईमधील घरी पोहचली होती. Congress On NCB: भाजप-बॉलीवुड-सँडलवुड-गोवा ड्रग्ज कनेक्शन याची चौकशी एनसीबी का नाही करत? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल.

बंगळूरू मधील आदित्य अल्वाच्या घरी मागील महिन्यात झाडाझडती झाली आहे. आदित्य अल्वा हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. सध्या कर्नाटकात Sandalwood नावाने एक प्रकरण गाजत आहे. यामध्ये कन्नड सिनेसृष्टीतील गायक, अभिनेत्यांना ड्रग्स पुरवठा होत असल्याचं म्हटलं जातं. या प्रकरणामध्ये आदित्य अल्वा वर देखील संशयाची सुई आहे.

दरम्यान बॉलिवूडमध्ये विवेक ऑबेरॉय हा क्वचित काही मोजक्या सिनेमांमधून रसिकांसमोर येतो. काही महिन्यांपूर्वी विवेक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकद्वारा लोकांसमोर आला होता. आता लॉकडाऊन नंतर पुन्हा हा सिनेमा थिएटर्समध्ये रिलॉन्च करण्यात येणार आहे.