
Don 3: डॉन 3 या चित्रपटात मुख्य भुमिकेत कोण झळकणार या संदर्भात बऱ्याच दिवसांपासून चर्चा चालू होती. डॉन 3 चित्रपटात नवीन चेहरा पाहायला मिळणार असं फरहान अख्तर यांनी घोषित केले होते. त्यावेळी सोशल मीडियावर या संदर्भात बरीच चर्चा रंगली. डॉन या चित्रपटाचा सिक्वेल येणार ही माहिती कळताच शाहरुक खानच्या चाहत्यांना आंनद झाला. परंतू या चित्रपटात नवा चेहरा पाहायला मिळणार अशी माहिती सोशल मीडियावर देण्यात आली होती.
फरहान खानच्या डॉन ३च्या चित्रपटात चॉकलेट बॉय म्हणजेच रणवीस सिंहच्या नावाची घोषणा केली.दरम्यान या चित्रपटात मुख्य भुमिकेत रणवीर सिंह सोबत कियारा अडवाणीचं नाव घेण्यात आले होते. डॉन ३ या चित्रपटाचं टीझरसमोर आल्यानंतर या चित्रपटात कोण कोण मुख्य भुमिकेत झळकणार याची चर्चा चालली होती. कियारा अडवानी संदर्भात एक माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार आता कियारा अडवानी या चित्रपटात दिसणार नाही.
क्रिती सेनोन ही कियारा अडवाणीची जागा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप क्रितीच्या नावावर कोणीही शिक्कामोर्तब केलेला नाही. नुकतीच एक्सेल एंटरटेनमेंटच्या ऑफिसबाहेर दिसल्याने आता क्रितीच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. ‘डॉन ३’ हा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे.