Disha Salian Death Case: दिशा सॅलियन कडून शेवटचा कॉल मैत्रिण अंकिताला, 100 क्रमांकावर संपर्क साधल्याचा दावा खोटा: मुंबई पोलिसांची माहिती
Disha Salian (Photo Credits-Twitter)

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) माजी मॅनेजर दिशा सॅलियन (Disha Salian) हीच्या मृत्यूनंतर काही उलट सुलट चर्चा सोशल मीडीयामध्ये रंगल्या होत्या. दरम्यान त्यापैकीच एक म्हणजे दिशा सॅलियनने मृत्यूपूर्वी 100 या आपत्कालीन क्रमांकावर फोन केल्याची माहिती समोर आली होती मात्र आज मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये हा दावा खोडून काढण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, दिशाच्या फोनवरून शेवटचा कॉल हा तिच्या मैत्रिणीला, अंकिताला करण्यात आला आहे.

8 जून 2020 दिवशी रात्री दिशा सॅलियन पश्चिम उपनगरातील एका उंच इमारती खाली कोसळल्याने तिचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार दिशाने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा देखील मृत्यू झाला. सुशांतने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान दिशाच्या मृतदेहाबद्दलदेखील सोशल मीडियात खोट्या बातम्या पसवल्या जात होत्या. तिचा मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याच्याही वृत्ताचं काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून खंडन करण्यात आलं होतं. त्याबाबत सॅलियन कुटुंबाकडून पोलिस स्टेशनमध्येही तक्रार नोंदवण्यात आली आहे. दिशा सलियन हिचा मृतदेह नग्न अवस्थेत आढल्याची बातमी चुकीची, पोलिसांनी दिले 'हे' स्पष्टीकरण.  

ANI Tweet

दिशा सॅलियन ही 28 वर्षीय तरूणी होती. काही काळ तिने सुशांत सिंग राजपूत सोबत काम केले होते. दरम्यान दिशाच्या अपघाती मृत्यूनंतर अनेकांनी शोक व्यक्त केला होता.

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या नितेश राणे यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहण्यात आले आहे. त्यामध्ये दिशाच्या बॉयफ्रेंडला मुंबईमध्ये सुरक्षा पुरवा. तो मुंबईमधून बाहेर गेला आहे. त्याचा जबाब महत्त्वाचा आहे. यामधून घटनेची माहिती मिळू शकते अशी मागणी राणेंकडून करण्यात आली आहे.