'Sooryavanshi' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी उशिरा पोहोचलेल्या रणवीर सिंह ची अजय देवगण आणि अक्षय कुमारसह पत्नी दिपिका पादुकोण ने घेतली शाळा, वाचा मजेशीर कमेंट
Sooryavanshi Trailer (Photo Credits; Instagram)

गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वांना उत्सुकता लागलेल्या 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) चित्रपटाचा ट्रेलर अखेर काल (2 मार्च) ला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा अंधेरीत मोठ्या दिमाखात पार पडला. चित्रपटातील प्रमुख स्टार्स अक्षय कुमार (Akshay Kumar), अजय देवगण (Ajay Devgan), कैटरीना कैफ (Katrina Kaif) सह दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) अगदी वेळेत ट्रेलर लाँच ठिकाणी हजर राहिले. मात्र सर्वात उशिरा पोहोचला तो सिनेमाचा आणखी एक कलाकार अभिनेता रणवीर सिंह. तो 40 मिनिटे उशिरा या सोहळ्याला पोहोचला आणि त्याने त्यांच्या ज्येष्ठ कलाकारांना वाट बघायला लावली यावर अनेक पत्रकारांनी त्याला धारेवर घेतले. यावर उत्तर देत "माझी बायको Town ला राहते' असे उत्तर देऊन या प्रश्नातून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

यावर अक्षय कुमार आणि अजय देवगण त्याची चांगलीच शाळा घेत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ जेव्हा रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ने पाहिला तेव्हा मात्र तिने देखील अक्षय आणि अजय सह आपल्या नवरोबाची शाळा घेतली.

पाहा तिचे मजेशीर कमेंट्स:

हेदेखील वाचा- Sooryavanshi Trailer: अक्षय कुमार, अजय देवगन आणि रणवीर सिंह स्टारर अॅक्शन्स ने भरपूर असलेला 'सूर्यवंशी' सिनेमाचा ट्रेलर झाला प्रदर्शित; Watch Video

रणवीर ने दिलेल्या उत्तराला प्रत्युत्तर करत "मी जरी टाऊन ला राहत असली तरीही मी सगळीकडे वेळेत पोहोचते" असा खोचक टोमणा दीपिका पादुकोणने मारला आहे.

देशातील पहिल्या Transgender Shelter होमसाठी अक्षयकुमार कडून दीड कोटींची मदत - Watch Video 

या चित्रपटात अक्षय कुमार शिवाय गुलशन ग्रोवर, अभिमन्यु दासानी, जॅकी श्रॉफ आणि सिकंदर खेर सुद्धा दिसतील. हा चित्रपट येत्या 24 मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.