
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) लढाईत पोलीस, डॉक्टर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स (Frontline Workers) यांच्या मदतीसाठी बहुतांश कलाकारांनी हात पुढे केला आहे. त्याचसोबत मनोरंजनाच्या माध्यमातून सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तत्परतेने कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. आता अभिनेता अक्षय कुमार याने मुंबई पोलीस आणि डॉक्टर्सांसह सर्व फ्रंटलाइन वर्कर्सना प्रोत्साहन देत ट्वीटरवर एक नवे गाणे शेअर केले आहे. टी-सीरीज निर्मित हे गाणे रख तू हौंसला याच फ्रंन्टलाइन वर्कर्सला सलाम करणारे आहे.
अक्षय कुमार याने ट्वीटरवर या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट करत असे म्हटले आहे की, धैर्य एक गुण आहे. परंतु कोरोना व्हायरसच्या विरोधातील या लढाईत मुंबई पोलीसांसाठी हे एक शक्तीशाली हत्यार आहे. येथे #RakhTuHausla समान भाव घुमत आहे. आपल्या सर्व फ्रंटलाइन योद्धांसाठी हा व्हिडिओ आहे. (Coronavirus: 'रोहित शेट्टी'कडून जुहू पोलिसांना विशेष खोल्यांचे वाटप; वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ यांनी मानले आभार)
Rakh Tu Haunsla Video:
कोरोना व्हायरसच्या लढाईसाठी अक्षय कुमार याने यापूर्वी पीएम केअर्स फंडसाठी 25 कोटी रुपयांची मदत केली होती. त्याचसोबत मुंबई पोलिसांसाठी 2 कोटी रुपयांचे दान केले होते.