अभिनेत्री Celina Jaitly ने गमावलेल्या बाळाची आठवण शेअर करत World Prematurity Day 2020 च्या निमित्ताने लिहली  हृद्यद्रावक पोस्ट!
Celina Jaitly with her kids (Pic Credit: Instagram)

माजी ब्युटी क्वीन सेलिना जेटली (Celina Jaitly)हीने 2017 साली जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. नुकताच 17 नोव्हेंबर दिवशी साजरा करण्यात आलेल्या World Prematurity Day चं निमित्त साधत तिने आई म्हणून तिचं दु:ख एका पोस्ट द्वारा सोशल मीडियात शेअर केलं आहे. सोबतच सध्या प्री-मॅच्युअर बालकांच्यापालकांना देखील आधार देत तिने समाजात जागृतीसाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. सेलिनाने 2017 साली समशेर आणि आर्थर या दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यापैकी समशेरचा हृद्याशी निगडीत आजारामुळे मृत्यू झाला. तर आर्थर हा दोन महिने Neonatal Intensive Care Unit (NICU) मध्ये उपचार घेऊन बचावला.

बाळांना प्री- मॅच्युअर जन्म देण्याचा त्रास सहन करताना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला त्याची आठवणही शेअर केली आहे. यामध्ये सेलिना लिहते, 'आम्ही अत्यंत हृद्यद्रावक स्थितीमधून गेलो होतो. एक मुलगा NICU मध्ये असताना त्याच्या जुळ्या भावाच्या अंतिम संस्कारांची तयारी करत होतो. पण दुबईतील त्या डॉक्टर आणि नर्सच्या अथक परिश्रमांनंतर आर्थर आमच्यामध्ये परत आला.

प्री मॅच्युअर मुलांना सांभाळण्यासाठी काय काळजी घ्यावी याची पालकांना योग्य माहिती असायला हवी. त्यासाठी सतत वाचन करत रहा. आता स्थिती बरीच सुधारली आहे. प्री मॅच्युअर मुलांमध्ये काही आरोग्याच्या समस्या असू शकतात. जीवघेणे आजार जडू शकतात. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या. दरम्यान समाजात विस्टन चर्चिल, अल्बर्ट आईन्स्टाईन सारखे अनेक प्रसिद्ध प्री-मॅच्युअर जन्मलेले लोकं आहेत. यामध्ये आमचा मुलगा आर्थर देखील असल्याचं तिनं म्हटलं आहे. Poonam Pandey Reaction On Pregnancy News: पूनम पांडे गर्भवती आहे का? अभिनेत्रीने सांगितलं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीमागील सत्य

सेलिना जेटली पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Celina Jaitly (@celinajaitlyofficial)

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने 2011 साली Peter Haag सोबत लग्न केलं त्यानंतर पुढील वर्षीच तिने विराज आणि विस्टन या जुळ्या मुलांना जन्म दिला. नंतर 5 वर्षांनी 10 सप्टेंबरला पुन्हा समशेर आबि आर्थर या जुळ्यांना तिने जन्म दिला. मात्र त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर फेसबूक पोस्ट लिहीत तेव्हासुद्धा तिने आपलं दु:ख मांडलं होतं.