Poonam Pandey (PC - Instagram)

Poonam Pandey Reaction On Pregnancy News: अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) ने 2020 आपला प्रियकर सॅम बॉम्बेशी लग्न केलं. सध्या पूनम पांडे आपल्या पतीसमवेत गोवा ट्रिपवर आहे. यावेळी, तिने केलेल्या नग्न शूटमुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. आता पूनम पांडे गर्भवती असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पूनमने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली असून ही केवळ अफवा असल्याचं तिने म्हटलं आहे.

पूनम पांडे ने नुकतीच स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत गर्भधारणेच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. यावेळी पूनमने सांगितलं की, या प्रकरणात काही सत्य असेल तर मी स्वत: जाहीर करील. (हेही वाचा - BTS Song Dynamite Video: K-Pop Band च्या नव्या 'डायनामाइट' गाण्याने मोडला नवा रेकॉर्ड; यूट्यूबवर मिळाले 600 दशलक्षाहून अधिक व्यूज)

पूनम पांडे विरोधात सरकारी मालमत्तेवर नग्न शूटिंग केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या तिला मुंबईला परत जाण्याची परवानगी मिळाली आहे. गर्भधारणेच्या अहवालानुसार, अशी बातमी आली होती की, पूनम 6 आठवड्यांपासून गर्भवती आहे आणि डॉक्टरांनीही याची पुष्टी केली आहे. पण पूनमने यास अफवा असल्याचं सांगितलं आहे. यासंदर्भात कोणत्याही बातमीचा स्वतः खुलासा करणार असल्याचंही पूनमने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey Bombay (@ipoonampandey)

दरम्यान, 10 सप्टेंबर रोजी पूनम पांडेने सोशल मीडियाच्या माध्यमातून सॅम बॉम्बेशी लग्न केल्याची घोषणा केली होती. पण लग्नाच्या एका आठवड्यातच पूनमने तिचा नवरा सॅमवर मारहाण केल्याचा आरोप केला होता आणि पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. मात्र नंतर दोघांमध्ये सामंजस्य झालं.