Aryan Khan याच्या अटकेमुळे शाहरुख खान याला झटका, BYJU's ने थांबविल्या जाहिराती
Shahrukh Khan (Photo Credits-Instagram)

क्रुज पार्टी ड्रग्ज प्रकरणी (Cruise Party Drug Case) आरोपी आर्यन खान (Aryan Khan) याचे वडील शाहरुख खान (Shah Rukh Khan) याला मोठा झटका बसला आहे. कारण देशातील सर्वाधिक मोठी एडटेक स्टार्ट अप कंपनी बायजूस (BYJU's) ने शाहरुख याच्या सर्व जाहिरांतींवर बंदी घातली आहे. तर शाहरुख खान हा 2017 पासून बायजूसचा ब्रँन्ड अॅम्बेसेडर आहे.(Cruise Ship Drugs Case: आर्यन खान, अरबाज मर्चंड, मुनमुन धमेचा यांना दिलासा नाही, न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अग्रिम बुकिंग व्यतिरिक्त बायजूसने त्याच्या सर्व जाहिराती थांबिवल्या आहेत. किंग खानच्या स्पॉन्सरशिप डिल्समध्ये बायजूस हा सर्वाधिक मोठा ब्रँन्ड होता. या व्यतिरिक्त शाहरुख खानकडे ह्युंदाई, रिलायन्स जिओ, एलजी, दुबई टुरिज्म सारख्या कंपन्यांच्या सुद्धा जाहिराती आहेत. तसेच रिपोर्टसच्या मते, बायजूस ब्रँन्डला अँडोर्स करण्यासाठी किंग खान याला 3-4 कोटी रुपये सुद्धा देत होती.

दरम्यान, क्रुज रेव्ह पार्टी प्रकरणी कोर्टाने आर्यन खान याचा जामिन फेटाळल्यानंतर त्याला आर्थर रोड जेलमध्ये पाठण्यात आले आहे. तसेच आर्यन खान याच्यासोबत अन्य 5 जणांना ही त्याच तुरुंगात पाठवले आहे. तर आरोपी मुनमुन धमेचासह दोन महिला आरोपींना सुद्धा भायखळा महिला तुरुंगात पाठविले आहे.(Aryan Khan च्या समर्थनार्थ Hrithik Roshan ची पोस्ट; पहा काय म्हणाला)

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर.एम नेर्लिकर यांनी म्हटले की, आर्यन, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चेंट यांच्या याचिकेवरील सुनावणी योग्य नाही आहे. आर्यन आणि इतर सात जणांच्या कोठडीत वाढ करण्याची एनसीबीची विनंती फेटाळण्यात आली होती. तसेच त्यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली. योगायोगाने, न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला ज्या दिवशी त्याची आई गौरी खानचा 51 वा वाढदिवस होता.