क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणी (Cruise Ship Drugs Case) अटक झालेला बॉलीवुड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan khan) याचा जामीन अर्ज न्यायालाने फेटाळला आहे. आर्यन खान याच्यासोबत या प्रकरणातील इतर दोन आरोपी अरबाज मर्चंड ( Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा (Moonmoon Dhamecha) याचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने म्हटले की, आर्यन खान, अरबाज मर्चेंड आणि मुनमुन धमेचा यांची याचिका सुनावणीस पात्र नाही. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात सांगितले की, न्यायालयाला जामीन देण्याचा अधिकार आहे. न्यायालयाला जर रिमांड देण्याचा अधिकार आहे तर जामीन देण्याचाही नक्कीच आहे.
सतीश माने शिंदे यांनी आर्यनच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडताना म्हटले की, माझ्या (आर्यन) जवळ अथवा बॅगमध्ये कोणत्याही प्रकारचे अंमली पादार्थ आढळले नाहीत. मॅजीस्ट्रेट कथीत आरोपीला जामीन देण्यास सक्षम आहे. कथीत आरोप किंवा गुन्ह्यासाठी जन्मठेप किंवा फाशी नाही आहे.
दरम्यान, एनसीबीच्या वतीने बाजू मांडताना ASG अनिल सिंह यांनी म्हटले की, हे एक असे प्रकरण आहे ज्यात 17 लोकांचा समावेश आहे. त्यांचे संबंध, सहभाग आदींची चौकशी प्राथमिक स्थितीत आहे. त्यामुळे आरोपींना जामीन मिळाल्यास प्रकरणात हस्तक्षेप केल्यासारखे होईल. हे आरोपी प्रभावशाली आहेत. त्यामुळे ते पूराव्यांशी छेडछाड करण्याचीही शक्यता आहे. तपासादरम्यान मोठी सामग्री मिळाली आहे. त्यामुळे यास्थितीत जामीन दिल्यास तापासात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. ASG अनिल सिंह यांनी पुढे सांगितले की, आरोपींच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून बरीच माहिती पुढे आली आहे. आर्यन आणि अरबाज आर्यन यांच्या चॅटवरुनही लक्षात येते की आरपी प्रदीर्घ काळापासून ड्रग्जचे सेवन करत होते. (हेही वाचा, Cruise Ship Drug Case: ड्रग्ज प्रकरणात Aryan Khan ची रवानगी Arthur Road Jail मध्ये; कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी सुरु)
ट्विट
#UPDATE | Mumbai's Esplanade court rejects bail plea of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha, in the case related to the seizure of drugs following a raid at a party on a cruise ship off the Mumbai coast
— ANI (@ANI) October 8, 2021
ईरियव खान याच्यासह सर्व 8 आरोपींना एनसीबी कार्यालयातून बाहेर काढण्यात आले आणि कारागृहात पाठविण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी एनसीबीच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. पुरुष आरोपींना आर्थ रोड कारागृह आणि महिला आरोपींना भायखळा कारागृहात पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे.गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर तीन ऑक्टोबर रोजी एनसीबीने छापेमारी केली होती. या छाप्यात आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्जेंट यांना अटक केली होती. तर इतर पाच आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती.