Cruise Ship Drug Case: ड्रग्ज प्रकरणात Aryan Khan ची रवानगी Arthur Road Jail मध्ये; कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी सुरु
Aryan Khan (Photo Credits: Instagram)

काल संध्याकाळी मुंबई न्यायालयात मुंबई क्रूज शिप ड्रग पार्टी प्रकरणी (Mumbai Cruise Ship Drug Case) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) 8 आरोपींबाबत सुनावणी पार पडली. न्यायालयाने या सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता एनसीबीने आर्यनसह 7 आरोपींना मुंबईतील आर्थर रोड (Arthur Jail) जेलमध्ये आणले आहे. आज आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती मात्र न्यायालयाच्या निर्णयाआधीच एनसीबी आर्यन खानसह जेलमध्ये पोहोचली आहे. आर्यन खान सध्या उर्वरित 8 आरोपींसह न्यायालयीन कोठडीत आहे.

न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्यानंतर ताबडतोब आर्यन खानच्या वतीने त्याच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला, ज्याची सुनावणी न्यायालयात सुरू झाली आहे. एनसीबीच्या वतीने ASG ने युक्तिवाद केला आहे की एनडीपीएस न्यायालयाला जामीन देण्याचा अधिकार नाही. हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे पाठवले पाहिजे, परंतु सतीश मानशिंदे यांनी अनिल सिंह यांचे युक्तिवाद नाकारले आहेत. आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे जामीन मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर एनसीबी त्याच्या जामीन अर्जाला विरोध करत आहे.

दोन्ही पक्ष जामीन अर्जावरील सुनावणी या न्यायालयात व्हावी की नाही याबाबत, वेगवेगळ्या प्रकरणांचा संदर्भ देऊन वाद घालत आहेत. मानशिंदे यांनी न्यायालयाला सांगितले की आर्यन खान हा एका सन्मानित कुटुंबातील आहे, त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. त्याच्या कुटुंबाचे समाजात स्थान आहे ज्यामुळे तो पळून जाऊ शकत नाही, म्हणूनच त्याला जामीन दिला पाहिजे. दुसरीकडे एएसजी अजूनही या मतावर ठाम आहे की या न्यायालयाला जामिनावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही.

(हेही वाचा: सुहाना खान ने खास फोटो शेअर करत आई गौरी खान ला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (See Pic)

दरम्यान,आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्जेंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच जणांना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. आरोपींच्या चौकशीच्या आधारे एनसीबीने ड्रग पॅडलर आणि इतरांना पकडले आहे. एनसीबीने 11 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान आणि इतर 7 आरोपींच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती. ते म्हणाले की, या प्रकरणात एनसीबी अजूनही अनेक ठिकाणी छापे घालत आहे आणि म्हणूनच या आरोपींना त्यांच्या कोठडीत ठेवणे आवश्यक आहे.