Aryan Khan च्या समर्थनार्थ Hrithik Roshan ची पोस्ट; पहा काय म्हणाला

शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर बॉलिवूडकर शाहरुखच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसून आले. यात आता अभिनेता ऋतिक रोशन याची ही भर पडली आहे. त्याने आर्यन खानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. पहा काय म्हणतोय...

Aryan Khan च्या समर्थनार्थ Hrithik Roshan ची पोस्ट; पहा काय म्हणाला
Hrithik Roshan & Aryan Khan (Photo Credits: Instagram)

कॉर्डेलिया क्रूझवर (Cordelia Cruise) सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीने छापा टाकला आणि त्यात इतरांसह शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. त्यानंतर मागील काही दिवसांपासून यावरुन चर्चा रंगत आहेत. आज आर्यनला न्यायालयात हजर केले जाणार असून आज त्याच्या सुटकेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आर्यन खानला अटक झाल्यापासून बॉलिवूड सेलिब्रिटी त्याला पाठिंबा दर्शवत आहेत. यात आता बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याने आर्यन खान च्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने लिहिले की, "आर्यनच्या आयुष्यात आलेल्या हा कठीण काळ त्याला चांगली व्यक्ती बनण्यास मदत करेल आणि उद्याचा दिवस सुर्याप्रमाणे उजळेल."

पहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2021 01:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).