चिमुकल्यांच्या 'त्या' सेल्फीने जिंकले बॉलिवूड स्टार्सचे मन; फोटो शेअर करत लिहिला खास संदेश
Bollywood Stars Shared Innocent selfie of kids (Photo Credits: Facebook and Twitter)

सोशल मीडियावर सध्या एक फोटो भलताच व्हायरल होत आहे. या फोटोत काही लहान मुले सेल्फी घेण्याची अॅक्टींग करत आहेत. मात्र त्यांच्या हातात फोन ऐवजी चप्पल आहे. चिमुकल्यांच्या या निरागस फोटोने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात बॉलिवूड स्टार्सही मागे नाहीत. लहानग्यांच्या चेहऱ्यावरील हा नितळ आनंद बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मनालाही भिडला आणि अनेक स्टार्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करत खास संदेश लिहिला. अनुपम खेर (Anupam Kher), बोमन ईरानी (Boman Irani), सुनील शेट्टी (Sunil Shetty) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी हा फोटो शेअर केला आहे.

अनुपम खेर यांनी हा फोटो शेअर करत लिहिले की, "गोष्टी त्यांच्यासाठी खूप सुंदर असतात ज्यांचा ठाऊक असते की त्या सर्वात सुंदर कशा केल्या जातात."

बोमन ईरानी यांनी फोटो शेअर करत लिहिले की, "तुम्ही फक्त तितकेच खुश होता. जितके तुम्ही होऊ इच्छिता. ही म्हण सर्वांसाठी अगदी चपलखपणे बसते. मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की, हा सेल्फी इतर कोणत्याही सेल्फी पेक्षा अधिक लाईल्स मिळवण्यास पात्र आहे."

अमिताभ बच्चन यांनीही हा फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर करत लिहिले की, "सामान्य माणूस आता सामान्य राहिलेला नाही. तो खास आहे. तो स्वतः स्वतःचा प्रचार करु शकतो. स्वतः आपल्या प्रगतीचा माध्यम होऊ शकतो. आपल्याकडे लोकांचे लक्ष कसे जाईल, हे त्याला अचूक कळले आहे. याचे माध्यम आहे- मोबाईल. किती मोबाईल मोजू शकता तुम्ही?"

सुनील शेट्टीने या फोटोला कॅप्शन देताना लिहिले की, "मी हा फोटो पाहिला आणि तो शेअर करण्याची इच्छा झाली. आनंद- ही खरोखर मनाची अवस्था आहे."

 

View this post on Instagram

 

Came across this beauuuuuutiful picture which I had to share . “HAPPINESS “ truly a state of mind !!!

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty) on

तुम्हीही आनंद कुठे इतर गोष्टींमध्ये किंवा बाहेरच्या जगात शोधत असाल तर थांबा. तो तुमच्या मनात दडला आहे. लहान सहान गोष्टीत तो तुम्हाला जरुर सापडेल.