'बॉब बिस्वास' चित्रपटात शाहरूख खान आणि अभिषेक बच्चन एकत्र झळकणार!
Abhishek Bachchan, SRK (PC - Instagram)

गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब असलेला बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) लवकरचं कमबॅक करणार आहे. शाहरूख खान (Shah Rukh Khan) आणि अभिषेक बच्चन 'बॉब बिस्वास' (Bob Biswas Movie) या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या 'कहानी' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. हा चित्रपट 'कहानी' सिनेमाचा खलनायक आणि सीरियल किलर बॉब बिस्वासवर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती शाहरूखची 'रेड चिलीज एन्टरटेन्मेंट' ही कंपनी करत आहे. रेड चिलीजने या निर्मिती संस्थेने केलेल्या ट्विटमध्येही 'नमोश्कार' असं बंगाली भाषेत लिहिलं आहे. त्यामुळे ही कथा 'कहानी' चित्रपटातील पात्रावर आधारित असून ती स्वतंत्रपणे मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा - बॉलिवूड कपल रणबीर-आलियाच्या लग्नाविषयी दीपिकाने केला 'हा' मोठा खुलासा)

दरम्यान, अभिषेक बच्चननेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच शाहरूखसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचंही त्याने म्हटलं आहे. या चित्रपटाचे शूटींग 2020 मध्ये सुरू होणार आहे. अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

'कहानी' चित्रपटात 'बॉब बिस्वास'ची भूमिका बंगाली अभिनेता शास्वत चॅटर्जीने साकारली होती. हे पात्र खूपच गाजले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांची मुलगी दिया घोष करणार आहे. दिया पहिल्यांदाच एका सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.