Shabana Azmi (Photo Credit: File Photo)

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांना स्वाईन फ्लू (Swine Flu) झाला असून मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून सर्दी-खोकला झाल्याने शबाना आझमी डॉक्टरांकडे गेल्या होता. तेव्हा त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (स्वाईन फ्लू रोखण्यासाठी 'ही' खबरदारी घ्या!)

मात्र या आजाराकडे शबाना यांनी सकारात्मकतेने बघायचे ठरवले आहे. स्वतःसाठी आणि विश्रांतीसाठी कमी वेळ मिळत असल्याने या आजारपणामुळे घ्याव्या लागणाऱ्या वेळेचा मी सदुपयोग करणार आहे. आत्मपरिक्षण करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सध्या स्वाईन फ्लू ने देशभरात थैमान घातले आहे. राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये स्वाईन फ्लूचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्वाईन फ्लू मुळे राजस्थानमध्ये 100 जणांचा बळी गेला असून गुजरातमध्ये 54 रुग्ण स्वाईन फ्लूने मृत्यूमुखी पडले आहेत. स्वाईन फ्लू मुळे देशात एकूण 255 जणांचा बळी गेला आहे.