बॉलिवूड अभिनेता Suniel Shetty च्या घरी लवकरच वाजणार सनई-चौघडे; Athiya Shetty आणि क्रिकेटर KL Rahul मुंबईमध्ये अडकणार लग्नबंधनात- Reports
केएल राहुल आणि अथिया शेट्टी (Photo Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. अभिनेत्याची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) लवकरच प्रसिद्ध क्रिकेटर केएल राहुलसोबत (KL Rahul) लग्न करणार आहे. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते, त्यानंतर आता ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. आता यावेळी दोघांच्या लग्नाची एक मोठी माहिती समोर आली आहे. ताज्या वृत्तानुसार दोघेही लवकरच सप्तपदी चालणार आहेत.

इंडिया टुडे इनसोबतच्या खास संवादात अथिया शेट्टीच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, दोघेही एकमेकांना तीन वर्षांहून अधिक काळ डेट करत आहेत. या दोघांमधील नाते अगदी जगजाहीर आहे. आता दोघेही येत्या तीन महिन्यांत लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या लग्नाची तयारीही सुरू झाल्याची माहिती जवळच्या सूत्राने दिली आहे. राहुलच्या पालकांनी नुकतीच मुंबईत अथियाच्या पालकांची भेट घेतल्याचेही सूत्राने सांगितले.

अथिया आणि राहुल त्यांच्या पालकांसोबत त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी गेले होते. लग्नानंतर ते याठिकाणी शिफ्ट होतील. येत्या 3 महिन्यांत या दोघांचे लग्न मुंबईत होणार आहे. दोन्ही कुटुंबांसाठी हा एक मोठा उत्सव असणार आहे. अथियाचा भाऊ अहान शेट्टीच्या 'तडप' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला राहुल उपस्थित होता. एक कपल म्हणून दोघेही पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. (हेही वाचा: अभिनेत्री अमृता पवार अडकली विवाहबंधनात; पहा लग्नविधी सोहळ्यात घेतलेला खास उखाणा (Watch Video)

दरम्यान, अलीकडेच, केएल राहुलला 8 जून रोजी प्रशिक्षणादरम्यान पाठीला दुखापत झाली होती. या दुखापतीच्या उपचारासाठी त्याला जर्मनीला जावे लागले आणि अथियाही त्याच्यासोबत गेली होती. राहुलने त्याच्या चाहत्यांना त्याच्या आरोग्याची माहिती देणारी एक नोट शेअर केली होती. राहुलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून ते परदेशी सुट्ट्या, लंच डेटपासून ते कॅज्युअल आउटिंगपर्यंत, दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले आहे.