![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/02/mahesh-anand1-380x214.jpg)
90 च्या दशकातील लोकप्रिय खलनायक महेश आनंद (Mahesh Anand) यांचे शनिवारी (9/2/1019) मुंबईतील यारी रोड वरील निवासस्थानी निधन झाले. मृत्यूनंतर दोन दिवसांनी घरातच मृतदेह आढळून आल्याने सिनेसृष्टीतील कलाकार आणि त्यांचे जवळील मित्र यांना धक्का बसला आहे. निधनानंतर कूपर हॉस्पिटलमध्ये महेश आनंद यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला होता. (बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक महेश आनंद यांचे निधन; दोन दिवसांनंतर घरात आढळला मृतदेह)
पोस्टमार्टम रिपोर्टनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्सोवा पोलिस स्टेशनचे सिनिअर पीआय रविंदर बडगुजर यांनी सांगितले की, "पलंगावर महेश यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या मृतदेहाजवळ रमची अर्धी बॉटल आणि एक ग्लासही होता. त्यामुळे मृत्यूपूर्वी ते दारु प्यायले होते."
महेश यांची कामवाली बाईने पोलिसांना सांगितले की, "महेश हे घरी एकटेच राहत होते. ते फोनही उचलत नव्हते आणि दरवाजाही उघडत नव्हते. त्यामुळे मला संशय येऊ लागला की घरात नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे. काही तासांपूर्वी घरातून बाहेर पडताना ते व्यवस्थित होते." त्यामुळे कामवाली बाई घरातून गेल्यानंतर आणि ती परत येण्याच्या मधल्या वेळेत महेश यांचे निधन झाले असावे, असा पोलिस अंदाज लावत आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून काम मिळत नसल्याने महेश यांना डिप्रेशन आले होते आणि त्यामुळेच ते व्यसनाधीन झाले होते.