Bigg Boss 14 ची विजेती रुबीना दिलैक हिचा हॉट अवतार आला समोर, पती अभिनव शुक्लासह Marjaneya गाण्यामध्ये दिसणार
Rubina Dilaik and Abhinav Shukla (Photo Credits: Instagram)

बिग बॉस 14 (Bigg Boss 14) च्या विजेतेपदावर नाव कोरलेली अभिनेत्री रूबीना दिलैक (Rubina Dilaik) लवकरच एका अल्बममध्ये दिसणार आहे. सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ (Neha Kakkar) हिच्या नव्या 'मरजानियां' (Marjaneya) या गाण्यामध्ये रूबीना दिलैक आपला पती अभिनव शुक्लासह (Abhinav Shukla) स्क्रिन शेअर करणार आहे. या गाण्याचे पोस्टर समोर आले असून यातील रूबीनाचा हॉट अवतार सध्या सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. बिग बॉस 14 ची विजेती होऊन घराबाहेर पडल्यानंतर तिला अनेक ऑफर्स यायला सुरुवात झाली आहे. नेहा कक्कड़ च्या मरजानियां च्या पोस्टरमध्ये रूबीना आणि अभिनव शुक्ला दोघे दिसत आहे. यात रूबीनाचा बोल्ड अँड ब्युटिफूल अवतार चाहत्यांवर भुरळ पाडत आहे.

अभिनव शुक्लाने मरजानिया चे पहिले पोस्टर शेअर केले आहे. यात अभिनव खूपच कम्फर्ट लूकमध्ये दिसत आहे. तर रुबीना दिलैक एका हॉट बीचवेअरमध्ये दिसत आहे.हेदेखील वाचा- Bigg Boss 14 Winner: रुबिना दिलैक बनली बिग बॉस 14 ची विजेती; सिद्धार्थ शुक्ला, विकास गुप्ता आणि हिना खान यांनी 'अशी' दिली प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhinav Shukla (@ashukla09)

हा पोस्टर शेअर करुन रूबीनाने 'आपका मुंडा मरजानिया में' असे कॅप्शन दिले आहे. तुम्हीही बघा दोघांचा शानदार अंदाज, असेही तिने पुढे लिहिले आहे.

बिग बॉस 14 चे स्पर्धक होण्यापूर्वी रूबीना आणि अभिनवचे नाते खूप खराब झाले होते. एवढचं तर ते विभक्त होण्यापर्यंत पोहोचले होते. मात्र बिग बॉसच्या घरात आल्यानंतर दोघांनी एकमेकांना वेळ दिला आहे. ज्यामुळे ते एकमेकांच्या अधिक जवळ आले. तिकडेच दुसरीकडे राखी सावंतच्या वर्तनामुळे दोघे खूप नाराज झाले होते. मात्र या भांडणामुळे दोघे आणखीन एकमेकांच्या जवळ आले.