Bharat New Poster: सलमान खान आणि कतरिना कैफ यांची झलक असलेले 'भारत' सिनेमाचे नवे पोस्टर आऊट
Katrina Kaif and Salman Khan in Bharat (Photo Credits: Twitter)

सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा 'भारत' (Bharat) सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. कतरिना कैफ, सलमान खानच्या लूक नंतर आता भारत सिनेमाचे नवे पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये सलमान खान मायनर्स कॅप (Miner's Cap) मध्ये दिसत आहे. तर कतरिना कैफ व्हाईट शर्ट आणि खाकी पॅंट या फॉर्मल लूकमध्ये दिसत आहे. केसांचे कर्ल कतरिनाच्या लूकला वेगळेपणा देत असून यात कतरिना अतिशय हॉट दिसत आहे.

सलमान खान याने हे नवे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, "आणि पुन्हा आमच्या जीवनात आली मॅडम सर." त्याचबरोबर #BharatKaJunoon हा हॅशटॅग वापरत कतरिना कैफला सलमानने टॅग केले आहे.

सलमान खान पोस्ट:

यापूर्वी सिनेमाचे दोन पोस्टर समोर आले होते. त्यापैकी एकात सलमान खानचा वृद्ध अवतार तर एकात यंक लूक पाहायला मिळतो.

'भारत' सिनेमाचे इतर दोन पोस्टर्स:

 

टीझरमध्येही आपण सलमानला विविध ढंगात पाहिले. आता पोस्टरमध्येही त्याचे वेगवेगळे लूक समोर येत आहेत. सलमान खान, कतरिना कैफ सोबतच या सिनेमामध्ये दिशा पटनी, तब्बू ,सुनील ग्रोवर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' सिनेमा 5 जून रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल.