Bharat Movie Aithey Aa Song: सलमान खान आणि कैटरीना कैफ यांचं 'इथ्थे आ...'  गाणं रसिकांच्या भेटीला (Watch Video)
Aithey Aa' Song (Photo Credits: You Tube)

सलमान खान (Salman Khan) आणि कैटरीना कैफ (Katrina Kaif) या जोडीचं 'भारत' (Bharat) सिनेमामधील तिसरं गाणं आज रसिकांच्या भेटीला आलं आहे. 'इथ्थे आ' (Aithey Aa) या गाण्यामध्ये सलमान खान आणि कैटरीना कैफ यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं एका लग्नाच्या सीन्सच्या पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलं आहे. सलमान खानने गाणं रसिकांसोबत शेअर करताना 'शादी वाला देसी गाना' असं म्हटलं आहे. (Bharat Movie Teaser: धर्मनिरपेक्ष भारतीयांना विचार करायला लावणार सलमान खानचा 'भारत')

'इथ्थे आ...' गाणं

भारत सिनेमामधील 'इथ्थे आ' या गाण्यामध्ये सलमान खान सोबत सिनेमात सह अभिनेत्री आणि प्रेयसीच्या भूमिकेत असलेली कैटरीना कैफ या गाण्यात सलमान सोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. गुलाबी रंगाच्या साडीमधील कॅटरिनाचे ठुमके या गाण्यामध्ये आकर्षण आहेत.

'इथ्थे आ' हे गाणं विशाल ददलानी, नीति मोहन, शेखर रविजियानी आणि कमाल यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं आहे. इरशाद कामिल याने हे गाणं लिहलं आहे. यापूर्वी 'भारत सिनेमामधील  'चाशनी' आणि 'स्लो मोशन'  दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. 'भारत' सिनेमा 5 जून दिवशी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.