Chashni Song: ‘भारत’ सिनेमातील सलमान खान आणि कैटरीना कैफ यांचे रोमॅन्टिक गाणं ‘चाशनी’ रसिकांच्या भेटीला (Watch Video)
Chashni Song (Photo Credits: You Tube)

Salman Khan - Katrina Kaif Romantic Song Chashni: बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान (Salman Khan) आणि कैटरीना कैफ (Katrina Kaif) ही लोकप्रिय जोडी यंदा ईदच्या मुहूर्तावर चाहत्यांसाठी ‘भारत’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमामध्ये 1964 ते 2010 या कालखंडातील बदलत्या भारत देशासोबत एक सर्वसामान्य माणसाचं आयुष्य कसं बदलतं? अशी या सिनेमाची कहाणी आहे.  सलमान खान  आणि कैटरीना कैफ ही प्रमुख जोडी या सिनेमात झळकणार आहे. आज  या सिनेमाचं दुसरं  गाणं ‘चाशनी’रिलीज करण्यात आलं आहे.  या गाण्यामध्ये सलमान आणि कैटरीना कैफचा रोमॅन्टिक अंदाज पहायला मिळणार आहे. Bharat Song Slow Motion: भारत सिनेमाचं 'स्लो मोशन' हे पहिलं गाणं प्रदर्शित, सलमान खान आणि दिशा पटाणीचा रेट्रो लूक झाला हिट (Watch Video)

चाशनी गाणं 

सलमान आणि  कैटरीना कैफवर शूट करण्यात आलेलं ‘चाशनी’ या गाण्याला विशाल शेखरचं संगीत आहे. तर अभिजीत श्रीवास्तव यांनी हे  गाणं गायलं आहे. वैभवी मर्चंटने या  गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.

‘भारत’ चित्रपटात सलमान आणि कैटरीना कैफ यांच्याशिवाय दिशा पाटनी, सुनील ग्रोवर, तब्बू, जॅकी श्रॉफ आणि नोरा फतेही सुद्धा झळकणार आहे. 5 जूनला रमजान ईदच्या दिवशी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येईल.