सलमान खान याच्या 'भारत' सिनेमाची सलग दुसऱ्या दिवशीही बंपर कमाई; पहा किती केला गल्ला
Bharat Poster (Photo Credits: Instagram)

सलमान खान (Salman Khan) आणि कैतरिना कैफ (Katrina Kaif) स्टारर 'भारत' (Bharat) सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी भारत सिनेमाने छप्परफाड कमाई करत एक नवा विक्रम रचला. पहिल्या दिवशी भारत सिनेमाने 42.30 कोटींचा गल्ला केला. तर दुसऱ्या दिवशीही या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवरील जोश कायम राहीला. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 31 कोटींची कमाई केली. म्हणजेच आतापर्यंत एकूण सिनेमाने 73.30 कोटींची कमाई केली आहे. (सलमान खान याच्या 'भारत' सिनेमातील Turpeya गाण्यात नोरा फतेही हिच्या हॉटनेसचा तडका)

'भारत' सिनेमाचे दोन दिवसांचे कलेक्शन:

तरण आदर्श ट्विट:

सलमान खान आणि अली अब्बास जफर या जोडीची जादू बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करण्यास पुन्हा एकदा यशस्वी ठरली. सिनेमा प्रदर्शनादिवशी भारताचा वर्ल्डकप मधील पहिला सामना असल्याने त्याचा परिणाम सिनेमावर होईल, असे वाटत होते. मात्र याउलट पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा 'भारत' हा दुसरा सिनेमा ठरला. प्रदर्शनापूर्वी सर्वाधिक अॅडव्हान्स बुकींग झाल्यानेही 'भारत' सिनेमाची सर्वत्र चर्चा होती.

सलमान-कैतरिना शिवाय सिनेमात तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोवर, सोनाली कुलकर्णी आणि नोरा फतेही आणि जॅकी श्रॉफ या कलाकरांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अतुल अग्निहोत्री, अलविरा अग्निहोत्री, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी एकत्रितपणे सिनेमाची निर्मिती केली आहे.