Turpeya Song: सलमान खान याच्या 'भारत' सिनेमातील Turpeya गाण्यात नोरा फतेही हिच्या हॉटनेसचा तडका (Watch Video)
Turpeya Song (Photo Credits: Youtube)

सलमान खान (Salman Khan) याच्या नव्या 'भारत' (Bharat) सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमाचे अजून एक गाणं Turpeya रसिकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणे सलमान खान आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात आपल्याला नोरा फतेही हिचा हॉट अवतार पाहायला मिळतो. सुखविंदर लिखित या गाण्याला विशाल-शेखर यांनी संगीत दिले आहे. ‘भारत’ सिनेमातील देशभक्तीपर 'जिंदा' गाणं रसिकांच्या भेटीला (Watch Video)

सलमान खान याने हे गाणे आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. गाणे शेअर करताना त्याने ट्विटमध्ये त्याने लिहिले की, "मैं तुर्पेया घर से दूर... तुर्पेया गाणे आता प्रदर्शित केले आहे."

सलमान खान ट्विट:

पहा गाण्याचा व्हिडिओ:

या सिनेमात सलमान खान आणि कैतरिना कैफ ही जोडी एकत्र झळकणार आहे. याशिवाय सिनेमात तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोवर, सोनाली कुलकर्णी आणि नोरा फतेही आणि जॅकी श्रॉफ या कलाकरांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अतुल अग्निहोत्री, अलविरा अग्निहोत्री, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी एकत्रितपणे सिनेमाची निर्मिती केली आहे. अली अब्बास दिग्दर्शित 'भारत' सिनेमात 5 जून रोजी ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे.