Bengali Actor Partha Sarathi Deb Dies PC TWITTER

Actor Partha Sarathi Deb Passes Away: ज्येष्ठ बंगाली अभिनेते पार्थ सारथी देब यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी त्यांच्या कुटुंबियांनी या संदर्भात माहिती माध्यमांना दिली. रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले आहे. शुक्रवारी रात्री 11.50 वाजता देब यांनी वयाच्या 68 वर्षी शेवटचा श्वास घेतला.(हेही वाचा- राजस्थानचा माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन)

मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ सारथी देब हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. सीओपीडीशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. गेल्या एका महिन्यांपासून त्यांना सरकारी एमआर बांगूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवडाभरात त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याचे माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

बंगाली चित्रपटात एक लोकप्रिय चेहरा म्हणून देव यांना ओळख मिळाली होती. रक्तबीज या सारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते. पार्थ सारथी देबने 200 हून अधिक कामांमध्ये काम केले होते - थिएटर, मालिका, चित्रपट आणि वेब सिरीज यांच्यात कामे केली आहे. ते पश्चिम बंगाल मोशन पिक्चर आर्टिस्ट फोरमचे उपाध्यक्ष होते. बंगाली चित्रपट क्षेत्रात या घटनेनंतर शोक पसरला आहे.  अनेक दिग्गज मंडळींनी पार्थ यांना श्रध्दांजली वाहली आहे.