Ayesha Takia Trolled: अभिनेत्री आयशा टाकियाने केली लिप सर्जरी? ओळखणे झाले कठीण, सोशल मिडियावर होत आहे ट्रोल (Watch Video)
आयशा टाकिया (Photo Credit : Instagram)

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या चेहर्‍याची शस्त्रक्रिया केली आहे. काहींची शस्त्रक्रिया ही खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाली आहे, तर काहींच्या बाबतीत त्यांचा चेहरा बराच खराब झाल्याचे दिसून आले आहे. अशा अभिनेत्रींना फार मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आता यामध्ये बॉलिवूडची एक सुंदर अभिनेत्री आयशा टाकिया (Ayesha Takia) हिचेही नाव सामील झाले आहे. आयशाने तिच्या ओठांची शस्त्रक्रिया केली होती, ज्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तिने पोस्ट केले आहेत. जे पाहून वापरकर्ते तिला खूप ट्रोल करीत आहेत.

आयशाने जी ओठांची सर्जरी करून घेतली आहे ती पूर्णपणे फसलेली असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे तिचा चेहरा खूपच वेगळा दिसत आहे. हॉलिवूड स्टार एंजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी बर्‍याच अभिनेत्रींनी त्यांच्या ओठांची शस्त्रक्रिया केली आहे. असे दिसून येत आहे की आयशालाही तसेच काहीसे करायचे होते मात्र आता ती चेष्टेचा विषय ठरली आहे. याआधीही आयशा तिच्या चेहऱ्याच्या सर्जरीमुळे ट्रोल झाली होती. त्यावेळी तिच्या चेहऱ्याचा आकार इतका बदलला होता की तिला ओळखणेही कठीण झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by 🧿Ayesha Takia Azmi (@ayeshatakia)

 

View this post on Instagram

 

A post shared by 🧿Ayesha Takia Azmi (@ayeshatakia)

आपल्या ऑनलाईन ट्रोलिंगवर आयशा एकदा म्हणाली होती की, ‘मी बर्‍याच वेळा ट्रोलिंगला बळी पडले आहे आणि मला सर्वांना सांगायचे आहे की, जर कोणी तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर आपण समजून घ्या की आपण उत्कृष्ट आणि अद्वितीय आहात. आपण खास आहात आणि अपमान करणार्‍यांना अजिबात जिंकू देऊ नका. लोकांशी दयाळूपणे वागा कारण कोण कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे आपल्याला माहित नाही.’

(हेही वाचा: Crime Patrol होस्ट Annup Sonii ने पूर्ण केला Crime Scene Investigation चा कोर्स; चाहत्यांसोबत शेअर केले सर्टिफिकेट)

दरम्यान, आयशाने 2004 मध्ये ‘टारझन: द वंडर कार’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी तील फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू पुरस्कारही मिळाला होता. आयशाच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये सोचा ना था, डोअर आणि वॉन्टेड यासारख्या चित्रपटांचा समावेश होता. आयशाने 2009 मध्ये समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमीचे पुत्र आणि रेस्टॉरंट मालक फरहान आझमीशी लग्न केले होते. दोघांनाही मिखाईल नावाचा मुलगा आहे.