Anup Soni (Photo Credits: Instagram)

गेले अनेक वर्षे अभिनेता अनुप सोनी (Annup Sonii) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'क्राइम पेट्रोल' (Crime Patrol) होस्ट करत आहे. सोनी टीव्हीवरील याच शोमुळे एक होस्ट म्हणून त्याला बरीच प्रसिद्ध मिळाली. आता अनुपने ‘क्राइम सीन इन्व्हेस्टिगेशन’ (Crime Scene Investigation) हा कोर्स पूर्ण केला आहे. हा एक शॉर्ट टर्म कोर्स असून लॉकडाऊनमध्ये अनुपने तो पूर्ण केला आहे. अनुपने इन्स्टाग्रामवर कोर्स पूर्ण केल्यावर मिळालेले प्रमाणपत्र शेअर केले आहे. ‘क्राइम पेट्रोल' हा गुन्हेगारी विश्वाशी निगडीत शो असून, 2010 पासून अनुप सोनी हा शो होस्ट करत आहे.

ही बातमी शेअर करताना अनुपने लिहिले आहे की, ‘लॉकडाऊन दरम्यान मी माझा वेळ आणि शक्ती अधिक रचनात्मक काहीतरी करण्यात व्यतीत करायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मी हा वेळ सत्कारणी लावत क्राइम सीन इन्व्हेस्टिगेशन’ चा प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केला. हे अत्यंत आव्हानात्मक होते. इतक्या वर्षानंतर पुन्हा अभ्यास सुरु करणे कठीण होते. परंतु निश्चितपणे, मला या निवडीचा अभिमान आहे.’ आंतरराष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्सेस (International Forensic Sciences) कडून अनुपला हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Annup Sonii (@anupsoni3)

क्राईम पेट्रोल ही देशातील सर्वाधिक काळ चालणारी गुन्हेगारीची मालिका आहे. 2010 मध्ये अनुप दुसर्‍या सिझनमध्ये या शोमध्ये सामील झाला. पुढे 2017 मध्ये त्याने हा शो सोडवा मात्र परत 2019 मध्ये त्याने हा शो होस्ट करण्यास सुरुवात केली. दरम्यान, शुक्रवारी अनूपने आपल्या बालिका वधूमधील सहकलाकार सुरेखा सिक्री यांना श्रद्धांजली वाहिली. 'मासा चली गईं, अब बस यादें हैं' असे अनुपने म्हटले होते. अनुप आणि सुरेखा सिक्री यांनी 6 वर्षे एकत्र काम केले होते.