Aryan Khan Debut: शाहरुख खानचा मुलगा आर्यन लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, अभिनय नाही तर करणार हे काम
Aryan Khan (Photo Credits: Instagram)

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) गेल्या वर्षी ड्रग्ज प्रकरणामुळे खूप चर्चेत होता. काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची सुटका झाली. आता दरम्यान, आर्यनच्या बॉलिवूडमधील (Bollywood) कामाबद्दल एक अपडेट समोर येत आहे. आर्यनला अभिनयात रस नसून त्याला फिल्ममेकिंग मध्ये आवड आहे, असे शाहरुखने स्वतः सांगितले आहे. दरम्यान, आर्यनच्या बॉलिवूडमधील कामाबद्दल बातम्या येत आहेत की, तो आता त्याच्या करिअरकडे वाटचाल करत आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, तो लवकरच एका चित्रपटाचे किंवा वेब सीरिजचे लेखन करणार आहे. आर्यन वेब-सीरिजबद्दल एका ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत चर्चा करत आहे आणि तो एका फीचर फिल्मवरही काम करत आहे. ही फिल्म शाहरूखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसद्वारे तयार केली जाणार आहे. आर्यननं लिहिलेली वेब सीरिज यावर्षी प्रदर्शित होईल, असं म्हटलं जात आहे. बिलाल सिद्दीकी हे या सारिजचे को- रायटर आहेत. याआधी शाहरुखने अनेकवेळा सांगितले आहे की, त्याला लिखाणाची आवड आहे आणि विशेष म्हणजे आर्यनला आता या क्षेत्रात काम करायचे आहे.

आर्यन काही काळापासून हॉलिवूड चित्रपट खूप पाहत आहे

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आर्यन काही काळापासून हॉलिवूड चित्रपट खूप पाहत आहे आणि त्याच्या कल्पना वडिलांसोबत शेअर करत आहे. जागतिक चित्रपटसृष्टीवर त्यांचे लक्ष आहे. रिमेक होऊ शकणार्‍या चित्रपटांबद्दल तो त्याच्या वडिलांशी बोलतो आणि त्यांचे हक्क विकत घेतो. त्यामुळे आर्यनला अभिनयात रस नसून सर्जनशील प्रक्रियेत रस असल्याचे निश्चित झाले आहे. असेही बोलले जात आहे की शाहरुखने त्याच्या आगामी 'पठान' चित्रपटातील लूक आणि अॅक्शन सीन्स आपल्या मुलाला आर्यनला दाखवले आहेत आणि त्याच्याकडून फीडबॅकही घेतला आहे. (हे ही वाचा The Kashmir Files Trailer: काश्मीर हत्याकांडाची कथा येणार बाहेर, 'क्रूर' वास्तवाने भरलेला 'द काश्मीर फाइल्स'चा ट्रेलर)

सुहाना खान करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण 

आता आर्यनला जरी अभिनयात रस नसला तरी शाहरुखची मुलगी सुहाना खान अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्यास उत्सुक आहे. सुहानाने न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचे धडे घेतले आहेत आणि अनेक लघुपट आणि नाटकांमध्येही काम केले आहे, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अशीही बातमी आली होती की सुहाना झोया अख्तरच्या प्रोजेक्टमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. असे म्हटले जात होते की झोया नेटफ्लिक्ससाठी एक वेब सीरिज बनवत आहे ज्यामध्ये सुहाना काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी सुहानाही झोयाच्या ऑफिसमध्ये जात असताना स्पॉट झाली होती.