Vijay Devarakonda (photo credits: Twitter)

अर्जुन रेड्डी (Arjun Reddy) या चित्रपटामुळे रातोरात स्टार बनलेला तेलुगु अभिनेता, विजय देवेरकोंडाने (Vijay Deverakonda) हैदराबादमध्ये ‘मोस्ट डिझायरेबल मॅन 2019’ (Most Desirable Man 2019) चे विजेतेपद कायम राखले आहे. यामध्ये त्याने प्रभास आणि राम चरण सारख्या सुपरस्टार्सनादेखील मागे टाकले आहे. हैदराबाद टाईम्सने मोस्ट डिझायरेबल मॅन 2019 च्या यादीमध्ये विजयला प्रथम स्थान दिले आहे. झूम टीव्ही एंटरटेनमेंट डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार, चाहत्यांनी गेल्या एक वर्षांच्या कालावधीत केलेल्या मतदानाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. विजयने सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद प्राप्त केले आहे. या यादीत राम चरण दुसर्‍या क्रमांकावर आहे.

'अर्जुन रेड्डी' चित्रपटाव्यतिरिक्त विजयने 'मेहनती' आणि 'डियर कॉम्रेड' सारख्या सुपरहिट चित्रपटातही काम केले आहे. येत्या काही वर्षांत विजय, चार्मी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसह हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव सध्या 'फाइटर' असे आहे. हिंदीसह तेलुगु भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रम्या कृष्णन, रोनित रॉय, विष्णू रेड्डी, आली आणि मकरंद देशपांडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

(हेही वाचा: Sexiest Asian Male 2019: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन ठरला आशियामधील सर्वाधिक सेक्सी पुरुष!)

पुरी आणि धर्मा प्रॉडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. सध्या असे बोलले जात आहे की, विजयच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याबरोबरच हे निर्माते विजयच्या सुपरहिट साउथच्या चित्रपटाचा रीमेक करण्याचा विचार करत आहेत. करण जोहर विजयच्या सुपरहिट फिल्म ‘वर्ल्ड फेमस लव्हर’चा हिंदी रिमेक बनवण्याचा विचार करीत आहे. याआधी करण जोहरने घोषणा केली होती की, तो आपल्या विजयच्या ‘डियर कॉमरेड’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहे.