Dhaakad: कंगना रनौत चा चित्रपट 'धाकड़' मध्ये अर्जुन रामपाल बनला खलनायक; पहा जबरदस्त लूक
धाकड़ पोस्टर (Image Credit: Instagram)

Dhaakad: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) च्या 'धाकड' (Dhaakad) अॅक्शन चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात कंगना एजंट अग्निची भूमिका साकारत आहे. या चित्रपटामधील तिचा लूक बर्‍यापैकी प्रभावी आहे. निर्मात्यांनी सोमवारी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. हा चित्रपट गांधी जयंतीनिमित्त 1 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अशातचं आता निर्मात्यांनी चित्रपटातील अर्जुन रामपालचा लूक समोर आणला आहे. या चित्रपटात अर्जुन खलनायकाची भूमिका साकारत आहे. या पोस्टरवर अर्जुनचा धाकड़ लुक पाहायला मिळत आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने आपल्या ट्विट हँडलवरून अर्जुन रामपालचा या चित्रपटातील फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अर्जुनचा खतरनाक अंदाज दिसत आहे. हातात बंदूक आणि चामड्याचे जाकीट असलेला त्याचा लूक एखाद्या गँग माफियासारखा दिसत आहे. (वाचा -प्रसिद्ध अभिनेता Kamal Haasan रुग्णालयात भरती; या कारणामुळे करावी लागली शस्त्रक्रिया)

यापूर्वी कंगनाने पोस्टर शेअर करताना लिहिलं होतं की, ती या चित्रपटात एजंट अन्निच्या भूमिकेत अत्यंत निर्भयी आणि खतरनाक स्वरुपात दिसणार आहे. धाकड हा भारताचा पहिला नायिकाभिमुख अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 1 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. रजनीश घई या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. या चित्रपटाशी बरीच मोठी नावे जुळली आहेत.