Ankita Lokhande झी रिश्ते पुरस्कार सोहळ्यात सुशांत सिंह राजपूत साठी करणार खास डान्स परफॉर्मन्स, व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती
Ankita Lokhande (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या झी रिश्ते पुरस्कार (Zee Rishtey Award 2020) सोहळ्यासाठी तयारीत बिझी आहे. या सोहळ्यासाठी ती खास डान्स परफॉर्मन्स देणार आहे. हा डान्स परफॉर्मन्स ती खास सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आठवणींना उजाळा देण्यासाठी करणार आहे. सध्या ती या डान्स परफॉर्मन्सची जोरदार तयारी करत आहे. तिने या तयारीचा एक व्हिडिओ शेअर केला असून आपण सुशांतला खूप मिस करत आहोत असे या पोस्ट खाली लिहिले आहे. तिने इन्स्टाग्रामवर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा परफॉर्मन्स आपण सुशांतला समर्पित करणार असल्याचे तिने म्हटले आहे.

अंकिता लोखंडे नेहा कक्कड़च्या 'चलो ले चले तुम्हे तारों के शहर में' या गाण्यावर सराव करताना दिसत आहे. यात व्हिडिओ खाली "यावेळी परफॉर्म करणं अतिशय वेगळं आणि अवघड आहे. त्यामुळे हा परफॉर्मन्स माझ्याकडून खास तुझ्यासाठी" असे अंकिताने म्हटले आहे.हेदेखील वाचा- Disha Salian Death Case: दिशा सालियान हिच्या मृत्यूप्रकरणी CBI चौकशीसाठी दाखल करण्यात आलेली PIL बॉम्बे हायकोर्टाने फेटाळली

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिताच्या या व्हिडिओला अनेक लोकांनी पाहिले असून 1 लाखाहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. सुशांतचे चाहते हा व्हिडिओ पाहून प्रचंड खूश असून ते अंकिताचा सुशांतसाठी समर्पित केलेला डान्स पाहण्यासाठी खूपच उत्सुक असणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही.

अनेकांनी तशा प्रतिक्रिया या व्हिडिओला दिल्या आहेत. आम्ही खूप उत्सुक आहोत हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी ते आम्ही खूप दु:खी आहोत की आम्ही तुझ्यासोबत सुशांतला पाहू शकत नाही. अशा अनेक प्रतिक्रिया मिळत आहे.