Disha Salian Death Case: दिशा सालियान हिच्या मृत्यूप्रकरणी CBI चौकशीसाठी दाखल करण्यात आलेली PIL बॉम्बे हायकोर्टाने फेटाळली
Disha Salian (Photo Credits-Twitter)

Disha Salian Death Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) राजपूत याची एक्स मॅनेजर (Ex-Manager) दिशा सालियान हिच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय (CBI) चौकशीसाठी एक याचिका दाखल केली होती. ती बॉम्बे हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. त्याचसोबत कोर्टाने असे ही म्हटले आहे की, दिशा हिच्या मृत्यूप्रकरणी कोणाकडे ही पुरावा असेल तर त्यांनी पोलिसांकडे CrPC प्रोव्हिजननुसार जावे. मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमुर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे, याचिका दाखल करण्यासाठी याचिकाकर्ता दिल्लीतील अधिवक्ता पुनीत ढांडा यांचा या प्रकरणी कोणताही संबंध नाही आहे. कोर्टाने प्रश्न उपस्थितीत करत म्हटले की, तुम्ही कोण आहात? जर दिशा सालियान नावाच्या व्यक्तीचा मृत्यूप्रकरणात काही गडबड असेल तर तिच्या परिवाराकडून कायद्यानुसार पावले उचलतीलच.

या वर्षात 8 जून रोजी मालाड मधील या रहिवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून 28 वर्षीय दिशा सालियान हिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. तर ढांडा यांनी आपल्या याचिकेत असे म्हटले होते की, दिशा सालियान हिच्या मृत्यूची सीबीआय चौकशी केली जावी आणि यावर उच्च न्यायालयाने याकडे लक्ष द्यावे.(Disha Salian Death Case: दिशा सॅलियन कडून शेवटचा कॉल मैत्रिण अंकिताला, 100 क्रमांकावर संपर्क साधल्याचा दावा खोटा: मुंबई पोलिसांची माहिती)

कोर्टाने याचिका फेटाळून लावत आपल्या आदेशात स्पष्ट केले की, 5 ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांनी एक प्रेस नोट जाहीर केली होती. त्यामध्ये असे म्हटले की, कोणत्याही व्यक्तीला दिशा सालियान हिच्या मृत्यूबद्दल माहिती असल्यास त्याने पोलिसांकडे संपर्क साधावा. तसेच पुढे कोर्टाने असे ही म्हटले की, याचिकार्त्याने पोलिसांशी सुद्धा संपर्क साधला नसल्याचा ही रेकॉर्ड आहे. त्यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे.

बॉम्बे हायकोर्टाने गेल्याच महिन्यात याचिकेवर सुनावणी करण्यास विरोध केला होता. ढांडा यांना प्रथम उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देशन दिले गेले होते. त्यानंतर ढांडा यांनी थेट हायकोर्टात धाव धेत याचिका दाखल केली होती. याचिकर्त्यांचे वकील विनीत ढांडा यांनी युक्तीवाद करत म्हटले होते की, मीडिया रिपोर्टमध्ये असे समोर आले होते की सालियान हिची हत्या झाली आहे. पोलिसांनी यामध्ये उच्च स्तरावर तपास न करताच हे प्रकरण बंद केले आहे.