Anant-Radhika Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नातील (Anant Ambani-Radhika Merchant Wedding) पाहुण्यांना सुपर लक्झरी ट्रीटमेंट (Super Luxury Treatment) मिळणार आहे. शुक्रवारी मुंबईत अनंत (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) च्या लग्नात पाहुण्यांना आणण्यासाठी अंबानी कुटुंबाने तीन फाल्कन-2000 जेट भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली आहे. अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्याची प्रेमिका राधिका मर्चंट सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. एअर चार्टर कंपनी क्लब वन एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन मेहरा यांनी सांगितले की, अंबानी कुटुंबाने लग्नातील पाहुण्यांना नेण्यासाठी तीन फाल्कन-2000 जेट भाड्याने घेतले आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी 100 हून अधिक खाजगी विमाने वापरण्यात येणार आहेत.
हा भव्य भारतीय विवाह सोहळा मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या वांद्रे कुर्ला सेंटर (BKC) येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. 12-15 जुलै रोजी दुपारी 1 ते मध्यरात्री दरम्यान कार्यक्रमस्थळाजवळील रस्ते केवळ कार्यक्रमाच्या वाहनांसाठी खुले असतील. मुंबईतील वाहतूक पोलिसांनी तीन दिवसांसाठी रस्त्यावरील निर्बंधांबाबत तपशीलवार सूचना जारी केल्या आहेत. (हेही वाचा -Anant Ambani-Radhika Merchant Wedding: मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडणार अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा; मुंबई पोलिसांनी 12 ते 15 जुलैसाठी जारी केले वाहतूक निर्बंध)
मुख्य विवाह सोहळा शुक्रवार, 12 जुलै रोजी होणार असून पुढील दोन दिवस आशीर्वाद (शुभ आशीर्वाद) आणि स्वागत समारंभासाठी ठेवण्यात आले आहेत. सध्या या परिसरात लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात वाहतूक मंदावली आहे. याशिवाय, मुंबईतील अंबानींची 27 मजली इमारती विशेष पद्धतीने सजवण्यात आली आहे. (हेही वाचा - Anant Ambani and Radhika Merchant यांच्या लग्नाची पहिली आमंत्रण पत्रिका Kashi Vishwanath Temple मध्ये अर्पण)
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाची चर्चा जगभरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जामनगरमध्ये या जोडप्याचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. त्यानंतर दुसरे प्री-वेडिंग इटली आणि फ्रान्समध्ये झाले. आता या जोडप्याच्या लग्नानचे गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईत अनेक कार्यक्रम सुरू आहेत. या समारंभात जस्टिन बीबर, रिहाना, कॅटी पेरी आदी कलाकारांनी परफॉर्मन्स केला.