
कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दररोज हजारो लोक कोरोनाचा बळी पडत आहेत. अलिकडेचं अनेक सेलिब्रिटीही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. सतीश कौशिक, बप्पी लहरी, मिलिंद सोमण, रणबीर कपूर, आमिर खान, मनोज बाजपेयी, आलिया भट्ट अशी बरीच नावेही या यादीत समाविष्ट झाली आहेत. त्याच वेळी, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी अनेक कलाकारांनी कोरोनाची लस घेतली आहे. नुकतचं राकेश रोशन, सतीश शहा, सलमान खान, संजय दत्त, सैफ अली खान, धर्मेंद्र, परेश रावल यांच्यासारख्या स्टार्संना कोरोनाची लस मिळाली आहे. त्याचवेळी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनाही कोरोनाची लस देण्यात आली आहे. बिग बीने स्वत: यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
मेगास्टार अमिताभ बच्चन यांना गुरुवारी कोरोनाची लस देण्यात आली आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यासंदर्भातील माहिती अमिताभ यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांनी ट्वीट करून लिहिलं आहे की, 'आज दुपारी कोरोना लस घेतली. सर्व काही ठीक आहे.' याशिवाय अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये कोरोना लसीच्या अनुभवाबद्दल तपशीलवार चर्चा केली आहे. ब्लॉगमध्ये त्याने लिहिले आहे की, काल संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी केली. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. म्हणूनचं आम्ही सर्वांनी ही लस घेतली आहे. अभिषेकने अद्याप लस घेतलेली नाही. तो बाहेर आहे. लवकरचं तो कोरोना लस घेईल. (वाचा - Alia Bhatt Tested COVID-19 Positive: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; सोशल मीडियावर दिली माहिती)
T 3861 -
Got it done !
My CoviD vaccination this afternoon ..
All well .. 🙏
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 1, 2021
गेल्या वर्षी बिग बीच्या घरात कोरोनाचा कहर पाहिला मिळाला होता. अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांच्यासह अमिताभ यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. या सर्वांना काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतचं या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
दरम्यान, धर्मेंद्र, सतीश शाह, जॉनी लीव्हर, जितेंद्र, हेमा मालिनी, सलमान खान या दिग्गजांनी अलीकडेचं कोविड लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर गुरुवारी अमिताभ बच्चन यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.