अमिताभ बच्चन यांनी शेअर केला चाहतीचा Singing Video; हॉस्पिटलमधील दिवस प्रसन्न केल्याबद्दल मानले आभार
Amitabh Bachchan (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली असून त्यांच्यावर सध्या मुंबईतील (Mumbai) नानावटी हॉस्पिटलमध्ये  (Nanavati Hospital) उपचार सुरु आहेत. बिग बी (Big B) यांची प्रकृती सुधारण्यासाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. तर अमिताभ बच्चनही हॉस्पिटलमधून सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी कनेक्ट होत आहेत. आज अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहतीचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत त्यांची चाहती सुरेख गाणे गात आहे. या गाण्याचेही बिग बी यांनी भरभरुन कौतुक केले आहे.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत एक मुलगी वेस्टर्न आणि क्लासिकल संगीताची धून वाजवत आपल्या सुरेल आवाजात गाणे गात आहे. तिच्या या गाण्याचे कौतुक करत अमिताभ यांनी लिहिले, "माझी म्युझिक पार्टनर आणि प्रिय मैत्रिण हिने मला हा व्हिडिओ पाठवला आहे. मला माहित नाही ही कोण आहे. पण एक सांगू शकतो, तुझ्याकडे खास कौशल्य आहे. देव तुझे कल्याण करो. तुझे हे चांगले काम चालू ठेव. तु माझा हॉस्पिटलमधील दिवस प्रसन्न केलास. असे यापूर्वी घडले नव्हते. कर्नाटक आणि वेस्टर्न पॉप चे मिक्सिंग अमेझिंग आहे." (कोविड-19 संसर्गावर उपचार घेत असलेल्या अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता)

Amitabh Bachchan Tweet:

दरम्यान, 2 दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांची कोरोना व्हायरस चाचणी निगेटीव्ह आल्याची बातमी समोर आली होती. परंतु, त्यानंतर लगेचच अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. सध्या अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.