अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या भीतीवर BMC मारणार हातोडा,जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण
Amitabh-Bachchan (Photo Credits: Facebook)

मुंबई महापालिकेकडून बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या एका भींतीवर हातोडा मारला जाणार आहे. असे बोलले जात आहे की, बीएमसी बिग बी यांच्या प्रतीक्षा बंगल्याची एक भींत तोडण्यासाठ कार्यवाही करु शकते. या भींतीसंदर्भात महापालिकेने अमिताभ बच्चन यांना 2017 रोजी नोटिस धाडली होती. मात्र यावर महापालिकेला अमिताभ बच्चन यांनी उत्तर दिले नाही. अशातच आता महापालिकेने मुंबईच्या उपनगरीय कलेक्ट्रेटच्या सर्वे अधिकाऱ्यांनी बंगलाच्या ज्या भागातील भींत तोडायची आहे त्याबद्दत त्यांना निर्देशन दिले आहेत.

खरंतर 2017 मध्ये रोडची रुंदी वाढवण्यासंदर्भात बच्चन परिवाराला एक नोटिस धाडली होती. ज्यामध्ये असे म्हटले की, प्रतीक्षा बंगल्याचा एक भाग संत ज्ञानेश्वर मार्गावरील रस्त्याची रुंदी वाढवण्यात येणार होती. महापालिकेने मुंबई उपनगरीय कलेक्टरच्या सर्वेक्षण अधिकाऱ्यांना रस्त्याच्या रुंदीकरणाच्या योजनेअंतर्गत बंगल्याचा भाग तोडण्याचे निर्देशन दिले आहेत.(बॉलिवूड अभिनेता Dino Morea आणि काँग्रेस नेते Ahmed Patel यांच्या जावयाची कोटी रुपयांची संपत्ती ED कडून जप्त)

संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण यासाठी केले जात आहे कारण रस्ता चंदन सिनेमा परिसर इस्कॉन मंदिरच्या दिशेने लिंक रोडला जोडला जातो. याच मार्गावर अमिताभ बच्चन यांचा बंगला आहे. यामुळेच महापालिकेला अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची एक भींत पाडावी लागणार आहे. गेल्या वर्षात कोर्टाने महापालिकेला परवानगी दिली आहे की, अमिताभ बच्चन यांची भींत तोडावी लागणार आहे. अमिताभ बच्चन यांचे दोन बंगले असून त्यांची नावे जनक आणि दुसरा जलसा असे आहे.