बॉलिवूड अभिनेता Dino Morea आणि काँग्रेस नेते Ahmed Patel यांच्या जावयाची कोटी रुपयांची संपत्ती ED कडून जप्त
Dino Morea (Photo Credits-Facebook)

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करत असेलल्या ईडने आज काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता डीनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास सुरु होता. गुजरात मधील फार्मास्युटिकल कंपनी स्टर्लिंग बायोटेक ग्रुपशी जोडली होती. PMLA अॅक्ट नुसार त्यांनी 4 लोकांची एकूण 8.79 कोटी रुपयंची प्रॉपर्टी ताब्यात घेतली आहे.

इंडिया टीव्हीच्या एका रिपोर्ट्सनुसार, यामध्ये संजय खान याची 3 कोटींची प्रॉपर्टी, डिओ मोरियाची 1.4 कोटी, अकील अब्दुलखीलील बचूअली यांची 1.98 कोटी आणि इरफान अहमद सिद्दीकी (अहमद पटेल यांचे जावई) यांची 2.14 कोटी रुपयांची संपत्ती आहे.(Gulshan Kumar Murder Case: गुलशन कुमार हत्या प्रकरणात अब्दुल राशिद दाउद मर्चेंट यास जन्मठेप)

Tweet:

या प्रकरणी ईडीने असे म्हटले की, स्टर्लिंग बायोटेक ग्रुपचे प्रमोटर नितीन संदेसरा आणि संदेसरा यांनी पळ काढला आहे. तपासादरम्यान या 4 जणांची नावे समोर आली. एका विशेष कोर्टाने प्रमोटर भाई नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि चेतन याची पत्नी दीप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना आर्थिक अपराध करणारे पळकुटे म्हणून घोषित केले आहे.

Tweet:

असे सांगितले जात आहे की, हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगचे असून यामध्ये कथित रुपात 14,500 कोटीचा बँक फ्रॉड करण्यात आला आहे. ज्यामध्ये स्टर्लिंग बायोटेक आणि याचे मुख्य प्रमोटर आणि डायरेक्टर यांचा समावेश आहे.