अमिताभ बच्चन करतायत 18 तास ड्युटी! 1 दिवसात शूट केले कौन बनेगा करोडपती चे 3 एपिसोड
Amitabh Bachchan On The Sets Of KBC (Photo Credits: Amitabh Bachchan Blog)

बॉलिवूड चे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून वारंवार अस्थिर होत असल्याने एकीकडे फॅन्सची चिंता वाढत आहे. तर दुसरीकडे बिग बी (Big B)  मात्र आपल्या कामाला प्राधान्य देत दिवसागणिक अधिक वेळ ड्युटी करत असल्याचे समजतेय. अलीकडेच बिग बी यांनी स्वतःच्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितल्यानुसार,एकाच दिवसात ते 18 तासांची शिफ्ट करत असून आजारपणात जितके काम पूर्ण होऊ शकले नाही त्याची कसर भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे कळत आहे. सध्या ते 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega  Crorepati) चे सूत्रसंचालन करत आहेत या शो चे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी एकाच दिवसात 3 एपिसोडचं शूटिंग केल्याचे देखील समजत आहे.

बिग बी यांनी पोस्ट मध्ये, 'हो सर, मी काम करतो. मी दररोज काम करतो. मी कालही काम केलं होतं, जे 18 तासांनंतर पूर्ण झालं. यामुळे मला प्रेम आणि आशीर्वाद मिळतात.' असे लिहिले आहे.

अमिताभ बच्चन ब्लॉग पोस्ट

Amitabh Bachchan Blog Post (Photo Credits: Screengrab, Blogpost)

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी अमिताभ यांना लिव्हरचा त्रास होत असल्याने नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे म्हंटले जात होते. या उपचारांनंतर सध्या अमिताभ यांची प्रकृती जरी सुधारत असली तरी डॉक्टरांनी त्यांना दगदग न करता विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र कर्तव्यनिष्ठता दाखवत प्रकृती सुधारतात अमिताभ यांनी आपल्या कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे.