India’s Got Latent | (Photo Credit- X)

Indias Got Latent Controversy: इंडियाज गॉट लेटेंट या कॉमेडी शोवरील गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. आता ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने गृहमंत्री अमित शहा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. पत्रात, असोसिएशनने 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने पत्रात इंडियाज गॉट लेटेंटच्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोमध्ये प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह मजकुराचा ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने तीव्र निषेध केला आहे.  ( Ranveer Allahbadia Apologised: युट्युबर रणवीर अल्लाहबादीया कडून वादग्रस्त विधानानंतर माफीनामा)

पाहा पोस्ट -

AICWA ने पत्रात लिहिले आहे- समय रैना यांनी होस्ट केलेल्या आणि रणवीर इलाहाबादिया, अपूर्व मखीजा, जसप्रीत सिंग, आशिष चंचलानी आणि इतरांनी परीक्षक म्हणून काम केलेल्या या शोने अत्यंत अपमानास्पद भाषेचा वापर करून सर्व नैतिक मर्यादा ओलांडल्या आहेत. यामध्ये पालक आणि कौटुंबिक मूल्यांविरुद्धच्या टिप्पण्यांचाही समावेश आहे, ज्या कोणत्याही सुसंस्कृत समाजात पूर्णपणे अस्वीकार्य आहेत.

दरम्यान युट्युबर रणवीर अल्लाहबादीयाच्या वादग्रस्त विधानानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात असताना आता त्याने सोशल मीडीयात एक व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे. "India's got latent मध्ये मी जे बोललो ते मी बोलायला नको होते. मला माफ करा. माझी टिप्पणी केवळ अयोग्य नव्हती, ती मजेदारही नव्हती. कॉमेडी करणं हे मला जमत नाही, मी फक्त सॉरी म्हणण्यासाठी आलो आहे." असे त्यांने आपल्या निवेदनात म्हटले.