Sonu Sood Illegal Construction Row: बीएमसी नोटीसी विरुद्धची याचिका Bombay High Court ने फेटाळल्यानंतर सोनू सूद ची Supreme Court त धाव
Sonu Sood (Photo Credits: Facebook)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याला जुहू मधील रहिवासी इमारतीचं हॉटेलमध्ये रूपांतरण करण्यावर बीएमसीने (BMC) नोटीस बजावली होती. या नोटीसेवरील याचिका बॉम्बे हायकोर्टाने (Bombay High Court) फेटाळल्यावर अभिनेत्याने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. 21 जानेवारी रोजी हायकोर्टाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी सोनू सूद ची याचिका फेटाळून लावली. (Sonu Sood Vs BMC: अभिनेता सोनू सुदला Bombay High Court चा झटका; बीएमसी नोटीसी विरुद्धची याचिका फेटाळली)

वकील विनीत दांडा यांनी कोर्टात सोनू सूद याची बाजू मांडली. आता त्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. दांडा यांनी सांगितले की, सोनू सूद ला ज्या जागेविषयी नोटीस बजावण्यात आली आहे त्या जागेचा तो मालक नाही. तरी देखील सोनू सूदच्या नावे बीएमसीकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. या आधारे सोनू सूद आपली बाजू सुप्रीम कोर्टात ठेवणार आहे.

सोनू सूद यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचबरोबर इमारतीच्या आतील बांधकामात बदल करण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. सोनू सूद वर अतिशय कठोर शब्दांत आरोप केले जात आहे. सोनू सूद हा चांगला नागरिक असून विशेषत: कोरोना काळात त्याने मोठे समाजकार्य केले आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये नोटीस मिळाल्यानंतर सोनू सूदच्या वकीलांनी हायकोर्टाकडे 10 आठवड्यांची मागणी केली होती आणि त्या दरम्यान इमारतीची तोडफोड करु नये अशी विनंतीही केली होती. दरम्यान, हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आपण कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम इमारतीत केलेले नाही असे सोनू सूदचे म्हणणे होते. तर शक्तिसागर या आपल्या राहत्या 6 मजली इमारतीमध्ये सोनू सूदने बेकायदेशीर बांधकाम केल्याची नोटीस बीएमसीने पाठवली होती. आपल्या राहत्या घराचे परवानगीशिवाय हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचे बीएमसीचे म्हणणे होते.