Neha Kakkar: सनी लिओनीनंतर गायक नेहा कक्कर ने केलं कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये टॉप
Neha Kakkar (Photo Credits: Instagram)

Neha Kakkar: काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचं (Sunny Leone) नाव कोलकाता येथील एका कॉलेजने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जारी केलेल्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये टॉपर म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतर आता बॉलिवूडची प्रसिद्ध गायक नेहा कक्करने (Neha Kakkar) पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील एका कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये टॉप केलं आहे. नेहाचं नाव माणिकचक कॉलेजच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जारी केलेल्या मेरिट लिस्टमध्ये पहिलं आलं आहे.

या घटनेनंतर संबंधित कॉलेजच्या प्राचार्याने सांगितलं की, हे कुणीतरी खोडकपणे केलं असून कलाकारांचं नाव टाकून ते अॅडमिशन प्रक्रिया खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉलेजच्या वेबसाइटवर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. (हेही वाचा - कंंगना रनौत म्हणते, बॉलिवूड माफिया पेक्षाही मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, राम कदम यांंना उत्तर देत केलेलंं ट्विट वाचा)

मात्र, त्यानंतर तातडीने कॉलेज प्रशासनाने चूक दुरूस्त करत नवीन यादी जाहीर केली. यासंदर्भात स्थानिक पोलीस स्टेशन आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार केली आहे, असं माणिकचक कॉलेज प्राचार्य अनिरुद्ध चक्रवर्ती यांनी सांगितलं आहे. याशिवाय नेहाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांची फिरकी घेतली आहे. तिने ट्विट करत 'पुढच्या सेमिस्टरमध्ये भेटू,' असं म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोलकात्याच्या आशुतोष कॉलेजमध्येदेखील अभिनेत्री सनी लिओनीचं नाव वेबसाइटवर जाहीर केलेल्या मेरिट लिस्टमध्ये टॉपर म्हणून दाखवण्यात आलं होतं. परंतु, त्यानंतर कॉलेजने आपली चूक दुरुस्त केली होती.