Ram Kadam And Kangana Ranaut (Photo Credits: File Image)

भाजप (BJP) प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना कंगना रनौत ने मुंबई पोलिसांबाबत असे मोठे वक्तव्य केलं आहे, बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असं कंगना रनौत (Kangana Ranaut) ने आपल्या ट्विट मध्ये स्पष्ट पणे म्हंंटलेलं आहे. मुंंबईमध्ये मला एकवेळ हिमाचल सरकार किंंवा केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी पण कृपया मुंंबई पोलिस (Mumbai Police) नको असे म्हणत कंंगनाने केलेले ट्विट आता सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांंनी अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांविषयी माहिती देण्यास तयार आहे. मात्र यासाठी तिला सुरक्षा द्यायला हवी. दुर्देवाने महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) अजूनही तिला सुरक्षा दिलेली नाही अशा आशयाचे ट्विट केले होते यावरच कंंगनाने असा प्रतिसाद दिला आहे.

Sushant Singh Rajput Death: सुशांंत सिंह राजपूत ने स्वतः एका मुलाखतीत Claustrophobia असल्याची दिली होती कबुली, पहा हा Viral Video

राम कदम यांनी कंगना रनौतला सुरक्षा देण्याची मागणी करत यासाठीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिले आहे. तसेच ट्विटर च्या माध्यमातुन सुद्धा ते या एकुण प्रकरणात सक्रिय सहभागी आहेत.

कंंगना रनौत ट्विट

दरम्यान, आणखीन एका ट्विट मध्ये राम कदम यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका करत सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांच्या सक्षम प्रतिमेला डागाळल्याचे म्हंंटले आहे. काही मोठ्या लोकांना वाचवण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे, असं आता जगासमोर आलं आहे. महाराष्ट्र सरकार कंगनाशी चर्चा करुन तिचा विश्वास पुन्हा मिळवु शकेल? हा प्रश्न आहे”, असे कदम यांंनी व्हिडिओ मध्ये म्हंंटले आहे.

राम कदम ट्विट

दरम्यान या सर्व ट्विट सीरीज वर नेटकर्‍यांंच्या मात्र संंमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतायत. अनेकांंनी कंंगना हा विषय मुद्दाम ताणत असल्याचे म्हंंटले आहे तर अशा प्रकारे पोलिसांंच्या सक्षमतेवर चिखलफेक करणे गैर असल्याच्याही कमेंंटस या ट्विट वर पाहायला मिळतायत. तर अनेकांंनी कंंगनाला समर्थन देत पोलिसांंवर टीका केली आहे.